
दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे….
सांगली प्रतिनिधी
सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पालघर घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळलीया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन वर्षापूर्वी पालघरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती..
दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला



