vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत  – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत  – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबई, प्रतिनिधी : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता.परंतु ही तांत्रिक अडचणी संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारावे जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत.

 

मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये,असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

 

0000

संबंधित पोस्ट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्‍दतीचे आदेश जारी..

मुंबई महानगर पालिकेत एकाच नावाचे दोन, बोगस कर्मचाऱ्याला आझाद मैदान पोलिसांनी पकडले.

७५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ला प्रारंभ!*अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; तर हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा !* – पू. रामगिरी महाराज, नगर

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात या मागणीसाठी….

IIT प्रवेश परीक्षेत मृदुल अग्रवाल पहिला, तर काव्याने मुलींमध्ये मारली बाजी….

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात.. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती