vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रवाशांची लाडकी लालपरी पुन्हा पूर्वपदावर; ST महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ…

 प्रवाशांची लाडकी लालपरी पुन्हा पूर्वपदावर; ST महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ…

 

मुंबई प्रतिनिधी गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील ‘एसटी’ सेवा विस्कळीत झाली होती. एसटी कामगारांचा संप सुरू होता. परंतू न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कामगार आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत. एसटीची सेवा पूर्वपदावर येत असल्याचं दिसतंय.

 

राज्यातील 50 टक्क्यांहून अधिक संपकरी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. एकूण 81 हजार कर्मचाऱ्यांपैकी गुरूवारी अखेर 41 हजार कर्मचारी रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात 16 हजार फे-या सुरू झाल्या आहेत.

 

एसटीची सेवा हळुहळू सुरू झाल्यान महामंडळाला रोज 13 कोटींचं उत्पन्न येऊ लागलंय. तब्बल सहा महिन्यांपासून दुरावलेली सर्वसामान्यांची हक्काची एसटी आता पुन्हा प्रवासी सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित पोस्ट

मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम चे प्रमुख महंत बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस….

आज 9 जुलै रोजीही मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इच्छूक व पात्र ज्येष्ठ नागरीकांसाठी संपर्क यादी जारी…