vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

गुंगीकारक व अवैध असलेली औषधे जप्त करून डोंगरी पोलीस ठाणेची बेधडक कारवाई…*

*गुंगीकारक व अवैध असलेली औषधे जप्त करून डोंगरी पोलीस ठाणेची बेधडक कारवाई…

 

 

*मुंबई:*  *डोंगरी पोलीस ठाणेचे दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक बायसठाकूर* यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने डोंगरी मोबाईल 02 वाहनावरील अंमलदार पोलीस *हवालदार पवार व पो.ना.म्हात्रे* हे पोलीस ठाणे हद्दीत उमरखाडी परिसरात गस्त करत असताना त्यांना MH- 01-CJ- 2256 ही टॅक्सी संशयितरित्या आढळून आली असल्याने पोलिस हवालदार पवार यांनी सदर टॅक्सी चालकाकडे चोकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने सदर टॅक्सी डोंगरी पोलीस ठाणेस आणण्यात आली.

 

सदर टॅक्सीतील मालाचा दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता,सदर टॅक्सीत *PHENSIREST Cough syrup,100ml, Contain Codeine Phosphate च्या प्रत्येकी 144 बॉटल्स असलेले 22 बॉक्स असे एकूण 3168 बॉटल्स आढळून आल्याने जप्त* कऱण्यात आले असून सदरबाबत *पो. ह. पवार* यांनी फिर्याद दिल्याने वि. स्था. गुरक 22 /2022 कलम 8(c),22(c),29NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून चालक नामे *मोहम्मद बशीत फारुख अन्सारी, वय -35 वर्षे व त्याचा साथीदार नामे अजीम मोहम्मद खान, वय -36* वर्षे या दोघांना अटक करण्यात आली. *एकूण रक्कम रु.3,42,144/-(1 बॉटल प्रत्येकी 108 रुपये )*

 

*सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबाना शेख तसेच दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक बायसठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी तसेच पोलिस उपनिरीक्षक आरडक व पोलीस उपनिरीक्षक येडगे यांच्या मदतीने करण्यात आली आहे.*

सदर प्रकरणाबाबत डोंगरी पोलीस ठाणेतील पोलीस कसोशीने तपास करत आहेत.

 

माहितीस्तव सादर,

 

*(शबाना शेख )*

*वरिष्ठ पोलीस निरीक्षक,*

*डोंगरी पोलीस ठाणे,*

*मुंबई…*

संबंधित पोस्ट

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मोजणीदारांचे काम बंद आंदोलन मागे

vishwatmaklokswamivarta

संविधान अमृत महोत्सवी वर्षात ‘घर घर संविधान’ अभियान;अधिकारांसोबत कर्तव्यांबाबतही जागरुक रहावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुन्हा एकदा काही भागांमध्ये पाऊस जोर धरताना दिसणार आहे , ‘या’ भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट…

vishwatmaklokswamivarta

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतरपरतले, पुन्हा आवाज घुमणार…