
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
शस्त्रक्रियेनंतर
परतले, पुन्हा आवाज घुमणार…
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दीड तास ही शस्त्रक्रिया पार पडली.
दरम्यान राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करत मी घरी पोहचलो आहे. असे म्हटले आहे. आपल्या आर्शिवादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली आहे.
काही वेळापूर्वीच, रुग्णलातून बाहेर पडून मी घरी पोहचलो आहे. आपले आर्शिवाद आणि प्रेम असेच कायम राहो! आपला नम्र राज ठाकरे. अशा आशयाचे ट्विट शेअर करत राज ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती दिली आहे.



