vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत सोमवार २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणीकपात**दमदार पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय*   *सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

*मुंबईत सोमवार २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणीकपात**दमदार पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय*

*सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन*

मुंबई प्रतिनिधी

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने सोमवार दिनांक २७ जून २०२२ पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

 

यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

 

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ४१ हजार ३८७ दशलक्ष लिटर म्हणजे ९.७७ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी हा जलसाठा १५.५४ टक्के इतका होता.

 

दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक २७ जून २०२२ पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व मुंबईकरांना विनम्र आवाहन करण्यात येते की, दमदार पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

*****

(जसंवि/१४३)

संबंधित पोस्ट

काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावण्यात आल्याचा नेटिझन्सचा दावा… होत आहे व्हिडिओ व्हायरल

डॉ. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत जिल्हाधिकारीकार्यालयाच्या आवारात साकारली भव्यदिव्य रांगोळी     “ वृध्द असो वा जवान ; अवश्य करा मतदान ”

महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शशी थरुर यांना मोठ्या फरकानं मात देत मोठ्या मताधिक्यानं  निवडून आले.

vishwatmaklokswamivarta