
आमदार खासदार नवनीत राणां दाम्पत्य नी पोलिसांसमोरच हात उंचावला, कडक बंदोबस्तात कोर्टात रवाना…
मुंबई प्रतिनिधीराणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली. यानंतर दिवसभराच्या राजकीय नाट्याचा अंत राणा दाम्पत्याच्या अटकेने झाला. मात्र, त्यात किरीट सोमय्यांची भर पडली. खार पोलीस स्टेशनला राणांना भेटण्यासाठी गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि सोमय्या जखमी झाले. (Kirit Somaiya attacked in khar of mumbai) अखेर सोमय्यांची तक्रार नोंदवण्यात आली. मात्र, ही बोगस असल्याचं त्यांनी म्हटलं. सोमय्यांच्या तक्रारीनंतर तत्काळ शिवसैनिकांनीही प्रति तक्रार दाखल करून सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप केला.
सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना संपूर्ण प्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी भाजप नेत्यांनी केल्याची सोमय्यांनी सांगितलं. केंद्रात राजीवकुमार यांच्याशी कॉल झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या माहितीनंतर भाजप दिल्लीत जाणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.
शिवसैनिक तीन किमी दूर होते असं या एफआयआरमध्ये लिहिलं आहे. खोटं आहे.काल माझ्या वर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केले हल्ला होता मी पोचण्या पूर्वी 70 ते 80 शिवसेनिकांची व्यवस्था केली होती मला शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला, 70 ते 80 शिवसैनिक माझ्यावर धावून आले या सर्वाला पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेतनवनीत राणांच्या अडचणी वाढल्यानवनीत राणा यांच्यावर दुसरा गुन्हा दाखलखार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलायकलम 353 अंतर्गत गुन्हासरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांची कारवाईकालच्या सर्व घडामोडी नंतर खार पोलीस ठाण्यात एकूण ४ गुन्ह्यांची नोंद



