vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पोलिसांनीच शिवसैनिकांना परवानगी दिली, देवेंद्र फडणवीस भडकले…..

पोलिसांनीच शिवसैनिकांना परवानगी दिली, देवेंद्र फडणवीस भडकले…..

 

मुंबई प्रतिनिधी

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शिवसेनेवर लक्ष्य साधल्यानंतर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. राणा यांच्या पाठिशी उभे असल्याचं भाजपच्या नेत्यांनी याआधीही स्पष्ट केलं. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांना भेटण्याचा आग्रह धरला. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला जात असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. (Shivsena Attacked on Kirit Somaiya)गाडीवर फेकलेला दगड थेट सोमय्यांना लागल्याने ते जखमी झाले. यानंतर रात्रभर राजकीय ड्रामा सुरू होता. आता सोमय्यांच्या दिमतीला भाजपने फौज उतरवली आहे. त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis on Kirit Somaiya Attack)सोमय्यांना झेड सिक्युरिटी असतानाही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनीच शिवसैनिकांना हल्ल्याची परवानगी दिल्याने हा प्रकार घडला. मला मुंबई पोलिसांची शरम वाटते, असं फडणवीस म्हणाले

लोक या सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर असे हल्ले करण्याचं काम सुरू आहे. आम्ही ‘इट का जवाब इट से देंगे’, असं आव्हान फडणवीसांनी दिलंय. देशात नाव असलेल्या मुंबई पोलिसांनी त्यांची अब्रू घालवली असून राज्यात लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सोमय्यांना झेड सिक्युरिटी देण्यात आली आहे. त्यांनी खारला येत असल्याचं अधिकृतपणे सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांचं काम केलं नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाहीशिवसैनिकांना पोलिसांनीच परवानगी दिलीगुंडागर्दी सुरू आहे, शरम वाटायला पाहिजे पोलिसांनाकायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहेरात्रीच्या वेळी एका महिलेला तुरुंगात ठेवता येत नाहीसर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून नवनीत राणांवर कारवाई झालीय पोलिसांना शरम वाटायला पाहिजे

 

संबंधित पोस्ट

बेलापूर, सानपाडा आणि तुर्भे येथील व्यावसायिक मालमत्ता जप्त-नवी मुंबई महापालिकेच्या जप्ती पथकाकडून थकीत मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

प्रधानमंत्री आदिवासी जनजाती न्याय महाभियानांतर्गत (PM-JANMAN)आदिम जमातीच्या व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा दिला लाभ२ हजार ९५६ आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना मिळाला लाभ..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

vishwatmaklokswamivarta

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

भोकरदन विधानसभा मतदार संघातील प्रस्थापितांना आजी-माजी आमदारांना यानिवडणुकीत त्यांची जागा दाखवा- अ‍ॅड. भास्कर मगरे- हजारो भुमिहिन,कास्तकरांची गर्दी…