vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा चा गुन्हा; जामीन मिळेपर्यंत कारागृहात.

 हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावरून खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा चा गुन्हा; जामीन मिळेपर्यंत कारागृहात.

मुंबई प्रतिनिधी

मुंबई पोलिसांना 27 एप्रिल दिवशी त्यांची बाजू मांडण्याची मुदत कोर्टाने दिली आहे तर वांद्रे दंडाधिकारी कोर्टात जामीनावर पुढील सुनावणी 29 एप्रिलला होईल असं सांगण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी   काल नवनीत राणा  आणि रवी राणा  यांना अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात सादर केले आहे. Bandra Magistrate’s Court कोर्ट मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये राणा दाम्पत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा (Sedition) देखील लावण्यात आला आहे. दंडाधिकारी कोर्टाच्या अख्त्यारिमध्ये याबाबतचा निर्णय देण्याचा अधिकार नसल्याने आता नवनीत राणा यांची रवानगी भायखळा तर रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड जेल किंवा तळोजा जेल  मध्ये होण्याची शक्यता आहे.

कोर्टात आज राणा दाम्पत्याची बाजू अ‍ॅड. रिझवान मर्चंट यांनी मांडली आहे. रिझवान यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी राणांची सहज सुटका होऊ नये म्हणून 2 एफआयआर दाखल केल्याचं म्हटलं आहे. तसेच हिंदू धर्मीय असलेले आणि राम भक्त असलेल्या ठाकरेंच्या घरासमोर देवाचं गुणगाण गाणारं हनुमान चालिसा म्हणणं हा राजद्रोह कसा होऊ शकतो असा प्रतिसवाल केला आहे. इतर धर्मियांच्या घरासमोर जर पठण झालं असतं तर तो राजद्रोह ठरला असता असं त्यांचं मत आहे. सरकारी वकिलांना राजद्रोह का लावण्यात आला आहे? याचं समाधानकारक उत्तर कोर्टात देता आलं नसल्याचं रिझवान मर्चंट यांचं मत आहे.

दरम्यान पोलिसांना 27 एप्रिल दिवशी त्यांची बाजू मांडण्याची मुदत कोर्टाने दिली आहे तर जामीनावर पुढील सुनावणी 29 एप्रिलला होईल असं सांगण्यात आले आहे. राणा दाम्पत्य आता जामीनासाठी वरील न्यायालयात दाद मागू शकणार आहे. दरम्यान सरकारी वकील म्हणून कोर्टात प्रदीप घरत बाजू मांडत आहेत.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने डीएमके सरकारमधील ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर छापा

vishwatmaklokswamivarta

राज्य आणि त्यांच्या महिला पोलिसांची संख्या ३३ टक्क्यांपर्यंत वाढवा, केंद्र सरकारची राज्यांना सूचना

आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या ८ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे राज्यपाल  भगवांत सिंह कोष्यारी यांना दिला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा…

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta