मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम पुन्हा दिल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खपवून घेतली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले  आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 4 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तो अयशस्वी झाल्यास लोक अशा मशिदींसमोर दुप्पट प्रमाणात हनुमान चालीसा वाजवतील असा इशारा त्यांनी दिला. रविवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेला एकोप्याने राहण्याचे आणि भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिप्पणी केली की, मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेन, आपला एक महाराष्ट्र आहे. आपण देशात प्रगतीशील राज्य म्हणून गणले जाते.  सर्वांनी एकोप्याने राहावे आणि जातींमध्ये एकता असावी. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यादरम्यान प्रत्येकाने ही जबाबदारी पार पाडावी, यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.