vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजी राजे यांना तुळजापूर मंदिरात गाभार्‍यात प्रवेश नकारल्याच्या निषेधार्थ आज तुळजापूर बंद

Tuljapur Band: Sambhaji Chhatrapati यांना तुळजापूर मंदिरात गाभार्‍यात प्रवेश नकारल्याच्या निषेधार्थ आज तुळजापूर बंद…

तुळजापूर प्रतिनिधी

संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिरामध्ये गभार्‍यात प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ आज तुळजापूर बंद (Tuljapur Band) पाळण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे. बंदच्या माध्यमातून मंदिर संस्थानाचा निषेध करण्यात आला आहे.

संभाजी छत्रपती सोमवार 9 मे दिवशी संध्याकाळी कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनासाठी संभाजीराजे छत्रपती हे देवीच्या गाभाऱ्यात जात असताना मंदिर प्रशासनाने नियम दाखवत त्यांना रोखले. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. छत्रपती देखील संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये जारी झाला होता. दरम्यान यानंतर छत्रपतींचा अपमान झाल्याने आज तुळजापूर बंद करण्यात आले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केलीसंभाजी छत्रपती हे कोल्हापूर संस्थानचे आहेत तसेच ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. नुकताच त्यांचा राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. आता ते कोणतं नवं पाऊल उचलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. नुकतीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानल्याचे फोटो सोशल मीडीयात आले होते.

संबंधित पोस्ट

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा-माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर..

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढायांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

विमानतळ प्रांगणात बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण उत्साहात जनकल्याणासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक-उद्योगमंत्री उदय सामंत

*जाहीर सूचना*

vishwatmaklokswamivarta

सीआयएसएफ’ च्या वतीने वंदे मातरम्’ सुरक्षित तटम समृद्ध भारतम’, सायक्लोथॉन- २०२६ उपक्रम

vishwatmaklokswamivarta