vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

जनता सुजाण आहे, योग्य वेळी धडा शिकवते; शरद पवार यांचा केंद्र सरकारला टोला

जनता सुजाण आहे, योग्य वेळी धडा शिकवते; शरद पवार यांचा केंद्र सरकारला टोला…

नवी दिल्ली प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. देशातील आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. नोटबंदीने काय झाले? देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली. श्रीलंका आणि पाकिस्तानातील अर्थव्यवस्था चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी धोरण ठरवताना काळजी घ्यायला हवी. राज्यातील जनता सुजाण असते. आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शाहणा असतो. तो योग्य वेळी धडा शिकवतो. याचे उदाहरण द्यायचे तर इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावली. लोकांना वाटलं राज्य धोक्यात आले आहे. लोकांनी इंदिरा गांधी यांच्या हातातून सत्ता काढून घेतली. पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. पण लोकांच्या लक्षात आलं हे राज्य व्यवस्थित चालवत नाहीत. त्यांनी त्यांच्याही हातातील राज्य काढून घेतले आणि इंदिरा गांधी यांच्या हाती सोपवले, अशी आठवणही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

शरद पवार यांनी एका भाषणात जवाहर राठोड यांच्या कवितेचा दाखला देत काही ओळी उच्चारल्या होत्या. नेमका तेवढाच व्हिडिओ महाराष्ट्र भाजपच्या (BJP) ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला. शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले अशा आशयाची टीकाही शरद पवार यांनी केली. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी थेट कविताच वाचून दाखवली. शरद पवार यांनी कवीता वाचल्यावर सांगितले की, जवाहर राठोड यांनी कवितेच्या माध्यमातून कष्टकरांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न राठोड यांनी केला असल्याचेही सांगितले

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या वरदहस्तामुळे उद्धव ठाकर राज्याचे मुख्यमंत्रीे, खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर महाविकास आघाडी वादामध्ये अजून एक वाद याची भर…

सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस आता कारवाई करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

माजी आमदार मंत्री बबनराव घोलप यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; शिवसेनेच.

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडी कामाला लागली….महायुतीचा मात्र उमेदवार ठरेना,महायुतीचा उमेदवार जाहीर होईना,भाजप- शिंदेसेना-अजीत पवार गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ  

vishwatmaklokswamivarta

जनतेच्या पैशाचा पूर्णपणे अपव्यय’ असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका… आदित्य ठाकरे शिवसेना माजी पर्यावरण मंत्री

vishwatmaklokswamivarta

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची घेतली होती का? – नवाब मलिक*