vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी ‘मविआ’ एकत्र लढणार

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मविआ’ एकत्र लढणार…

नवी मुंबई प्रतिनिधीपावसाळ्यानंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर मंगळवारी नवी मुंबईतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या वेळी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढण्याचा एकमुखी निर्णय झाला. विशेष म्हणजे या तीनही पक्षांच्या नेतृत्वाने अद्यापही नवी मुंबईची निवडणुकीत आघाडी करून लढण्याबाबत घोषणा केलेली नाही. कोविडमुळे गेले दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांना अखेर ऑक्टोबर महिन्याचा मुहूर्त मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचे निर्देश दिल्यामुळे राज्याचे निवडणूक आयोग कामाला लागले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिला व पुरुष आणि इतर प्रवर्गातील आरक्षणाची सोडत निघणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासन आणि निवडणूक विभाग कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत नवी मुंबईतील राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. पावसाळ्यात बैठका आणि रणनीती आखण्यात अडथळा येऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नवी मुंबईतील नेत्यांनी पुन्हा बैठकांचे सत्र सुरु केले

सानपाडा येथे आयोजित केलेल्या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, माजी उपमहापौर अविनाश लाड आणि माजी नगरसेवक संतोष शेट्टी आदी नेते मंडळी उपस्थित होती.बैठकीत आगामी महापालिकेच्या धर्तीवर चर्चा झाली. येणारी निवडणूक मविआच्या नेतृत्त्वाखाली लढायची हे निश्चित झाले. कोणत्या जागेवर कोण लढेल, कुठून कोण उभा राहील याबाबत चर्चा करण्यात आली. जो उमेदवार सक्षम असेल, अशाच इच्छुकाला उमेदवारी देण्यात येईल. अर्थात स्थानिक नगरसेवकाचा जागेवर पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. अशी चर्चा बैठकी दरम्यान झाली.महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वाखाली लढण्याची आमची सर्व नेत्यांची इच्छा आहे. त्याबाबत आज चर्चा झाली. परंतु अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठीचा

संतोष शेट्टी, माजी नगरसेवककाँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आदेश धाब्यावरराज्यात महाविकास आघाडी असली तरी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय प्रदेशपातळीवर होईल, तोपर्यंत स्थानिक नेत्यांनी आघाडीबद्दल चर्चा व बैठका करू नका, असा सज्जड दमवजा सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी या सूचना नेते मंडळींना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही नवी मुंबईच्या काँग्रेसच्या नेत्यांनी बैठका घेऊन महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलावर चर्चा करून पटोलेंना आव्हान दिले.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारातून कळवा येथे भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

वसई – भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा तूर्तास प्रायोगिक तत्त्वावर

vishwatmaklokswamivarta

इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा – औषधनिर्माण क्षेत्रावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

विलास सहकारी साखर कारखान्यास साखर आयुक्तालय,पुणेचे संचालक यशवंत गिरी यांची सदिच्छा भेट मांजरा परीवारातील संस्थाच्या कामकाजाचे केले कौतूक ऊस तोडणी यांत्रिकीकरण व आर्थिक नियोजनाबाबत गौरवोद्गार.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ७५ फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण चित्ररथ व इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात,दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु…