vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीसांनी केली अटल सोनसाखळी चोरास अटक*

कोपरखैरणे पोलीसांनी केली अटल सोनसाखळी चोरास अटक*

*कोपरखैरणे पोलीसांनी केली अटल सोनसाखळी चोरास अटक* कोपरखैरणे पोलीस ठाणे हददीत चैन जबरी चोरी च्या गुन्हयात वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप तिदार यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकात गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली होती. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी चैन जबरी चोरीच्या गुन्हयांचा तांत्रिक तपास करून तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चैन जबरी चोरीचा सराईत गुन्हेगार आरोपीत नामे १)समद शमशुलहक खान, वय ३३ वर्षे, रा. डी/ ३०३, पाटनकर रेसिडेन्सी,साई नगर, उमराले, नालासोपारा, वेस्ट २)रिषभ भागवत प्रसाद जयस्वाल, वय २५ वर्षे, धंदा ट्रान्स्पोर्ट व्यवसाय, रा. फ्लॅट नं.४०२, छवीय्या पार्क,बाळकुमरोड, कापुरबावडी, ठाणे पुर्व यांना दि. २०/०५/२०२२ रोजी अटक केली. त्याचे कडे केलेल्या तपासाच्या अनुषंगाने कोपरखैरणे पोलीस ठाणे येथील चैन जबरी चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले असुन सदर गुन्हयात वापरलेली बर्गमॅन मोटार सायकल व सोनेचा मुददेमाल असा एकुण रू ४,३०,००० /-किंमतीचा जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपीत समद खान हा सराईत गुन्हेगार असुन या पुर्वी देखील त्यांने अशा प्रकारचे ११ गुन्हे केले होते त्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यांनतर त्याने जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे गुन्हे करीत होता. तसेच आरोपीत कं १ यांस दिनांक ०७/०६/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तसेच आरोपीत कं २ यांस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, मा.सह पोलीस आयुक्त श्री. जय जाधव, तसेच मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ –१ श्री. विवेक पानसरे व मा. सहा. पोलीस आयुक्त, वाशी विभाग, डी. डी. टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप तिदार, पोलीस निरीक्षक गजानन कदम, सहा. पोलीस निरीक्षक दशरथ विटकर, पोलीस उप निरीक्षक सागर धुमाळ, पोहवा २०७५ पवार, पोना २०५७ भालेराव, पोना /१८०२ पाटील, पोना/१७३७ डोगरे, पोना १७५७ कांबळे, पोशि ३२७० बुधवंत, पोशि १२१३४ गिते, पोशि १२३४३ निकम, पोशि ३४७४ भोसले यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

भिवंडी येथील  २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील धक्कादायक घटना तरुणाच्या हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, दुसरीकडे भावाकडून भावाची हत्या…

पुण्यामध्ये कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील वाशिममध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका, दोघांना अटक…

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर धडक कारवाई1 कोटी 22 लाख 76 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त..

विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा गुन्हाच; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्व निर्णय…

vishwatmaklokswamivarta