
अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप; तब्बल 950 जणांचा मृत्यू, 610 जखमी…
देश प्रतिनिधी
तालिबान सरकारचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अचूक माहिती दिली नाही. पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या भीषण भूकंपात आपल्या देशातील शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. USGS ने दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 नोंदवण्यात आली. आग्नेय अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून सुमारे 44 किमी (27 मैल) अंतरावर 51 किमी खोल हा भूकंप झाला.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील भूकंपामुळे 950 लोकांचा मृत्यू झाला असून 610 लोक जखमी झाले आहेत. खोस्त आणि नांगरहार या पूर्वेकडील प्रांतांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे
. भूकंपग्रस्त पाकटिकामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे, तसेच येथे भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत.



