
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून 2 दिवसांच्या पाहुणचारानंतर पंढरपूर कडे मार्गस्थ..
पुणे प्रतिनिधी
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन कडे मार्गस्थ झाला आहे.
मागील दोन दिवस पुण्यात पाहुणचार घेतल्यानंतर आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन कडे मार्गस्थ झाला आहे. यंदा 10 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पंढरपूरात या पालख्या दाखल होणार आहे. दोन वर्षांनंतर पायी वारी होत असल्याने वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर संत श्रेष्ठ #ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु #तुकाराम महाराजांचा #पालखी सोहळा #उरुळी_कांचन कडे मार्गस्थ झाला. जय हरी माऊली#Wari2022 #Pune



