vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

धक्कादायक: भगवंत मान यांच्यावर रोड शोदरम्यान हल्ला; चेहऱ्याला झाली इजा

 धक्कादायक: भगवंत मान यांच्यावर रोड शोदरम्यान हल्ला; चेहऱ्याला झाली इजा

पंजाब  प्रतिनिधी: अमृतसर:पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असतानाच आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच गर्दीतून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला असून त्यात मान हे जखमी झाले आहेत. भगवंत मान यांच्या चेहऱ्यावर मार लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना गंभीर इजा झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भगवंत मान यांच्या अटारीतील रोड शो साठी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फाही मोठ्या संख्येने समर्थक उभे होते. कारचा सनरूफ उघडून मान हे उभे होते. लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले होते. गर्दीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात असतानाच अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकून मारण्यात आला व त्यात त्यांच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला इजा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर तातडीने मान हे जवळच्या रुग्णालयात दाखल झाले. तिथे इलाज झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट

‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

vishwatmaklokswamivarta

रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta

निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

कविवर्य प्रा. जयराम खेडेकर यांना एमजीएमचा एक लाख रुपयांचा तर कवयित्री शिल्पा देशपांडे यांना 11 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

पोलादपूर, महाड व माणगाव तालुक्यातील माजी सैनिक, विधवा,अवलंबित डिफेन्स पेंशन धारकांसाठी भेट दौऱ्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta