vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

 ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की तिथेच भाजपा नेते खासदार सोमय्यांचा सत्कार

ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की तिथेच भाजपा नेते खासदार सोमय्यांचा सत्कार…

पुणे प्रतिनिधी: काही दिवसांपूर्वी भाजपचे  माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या  यांना शिवसैनिकांनी  धक्काबुक्की करण्यात आली होती. या मारहाणीत किरीट सोमैय्या यांना दुखापत झाली होती. पुणे महापालिकेच्या आवारात त्यांना ही धक्काबुक्की करण्यात आली. त्याच पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला आहे. यावेळेस भाजपकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं गेलं.

या दरम्यान पालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप नगरसेवंकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी त्याच पायऱ्यांवर ठिय्या धरला

नक्की काय झालं होतं?

सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. याबाबत सोमय्या निवेदन देण्यासाठी मागील शनिवारी पुणे महापालिकेच्या कार्यालयात आले होते.

यावेळेस पायऱ्यांवर एकच खळबळ उडाली. त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की केली गेली. हा सर्व प्रकार पालिकेच्या पायऱ्यांवर घडला. या घटनेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवला. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेत चांगलीत हमरीतुमरी पाहायला मिळाली होती.

संबंधित पोस्ट

ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल….

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भेटीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार,  शिवसेनेचे  संजय राऊत, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे गंभीर विषयांवर चर्चा…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत सकल हिंदू समाज रक्षणासाठी लव जेहाद आणि धर्मानंतर विरोधी कायद्याच्या मागणी, सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा

vishwatmaklokswamivarta

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपीट, वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजूनही राज्यातील राजकारण तापलेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकावर हल्लाबोल

vishwatmaklokswamivarta

मतदान वाढविण्यासाठी मतदान सख्तीचे करणारा कायदा करावा- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta