vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

रोहित शर्माबाबत टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रोहितची कोरोना चाचणी निगेटिव्ह

रोहित शर्माबाबत टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रोहितची कोरोना चाचणी निगेटिव्ह…

क्रिकेट प्रतिनिधी

 

रोहित शर्माबाबत टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रोहितची कोरोना चाचणी निगेटिव्ह आला आहे. त्‍याला इंग्‍लंड विरुद्धच्‍या 5व्‍या कसोटीतून (IND vs ENG) बाहेर बसायला लागलं होत.

त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाची कमान सांभाळत आहे. बीसीसीआयने नुकतेच टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. त्यामध्ये रोहित शर्माकडे दोन्ही संघांची कमान सोपवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग बनणार आहे. आयपीएल 2022 पासून रोहित आतापर्यंत एक पण आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याने सामन्यातून बाहेर पडला होता.

संघातील इतर खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पाचवी कसोटी 5 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे विराट कोहलीसह 5 वरिष्ठ खेळाडूंना टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाला इंग्लंडनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचं आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड होणार आहेत. अशा परिस्थितीत आता संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड अशा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छितात ज्यांची T20 वर्ल्डसाठी निवड होऊ शकते. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हती.

 

संबंधित पोस्ट

राज्यातील खेळाडुंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ…

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ठेवले 107 धावांचे लक्ष्य, अर्शदीप आणि चहरच्या जोडीने केली कमाल

vishwatmaklokswamivarta

आजपासून आयसीसी अंडर-19 क्रिकेटचा महाकुंभ सुरु, जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद

vishwatmaklokswamivarta

५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष गटाला विभागून तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बाजी ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता भव्य समारोपीय समारंभातून संपन्न

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ