vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी व ठाणे महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुब्रतो मुखर्जी स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम येथे, दिनांक 07/07 25 रोजी प्रचंड उत्साहात सुरू झाली आहे.

         बाद पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांमधील, मुलांच्या गटात 17 वर्षाखालील मुले 32 संघ, मुलींच्या गटात 11 संघ व पंधरा वर्षाखालील मुले 31 संघ अशा एकूण 74 संघानी या स्पर्धेत भाग घेतला आहे.

          नवीन शैक्षणिक वर्ष 2025 – 26 या वर्षातील पहिलीच क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ठरेल अशी प्रतिक्रिया श्री. प्रमोद वाघमोडे यांनी उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना दिली.

क्रीडा समन्वयक श्री. शंकर बरकडेसर यांच्या उपस्थितीत उद्घाटन मुंबई विभाग संपर्कप्रमुख तथा जिल्हाध्यक्ष ठाणे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ चे श्री. प्रमोद वाघमाेडेसर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पार पडले क्रीडा शिक्षक श्री. नामदेव पाटील, निखिल गावडे, अन्वर खान, फुटबॉल प्रशिक्षक आतिफ शेख, स्पर्धा सहाय्यक सौ सीमा शिंदे व अनेक शाळांमधील क्रीडाशिक्षक, तसेच फुटबॉल प्रशिक्षक उपस्थित होते. सदरची स्पर्धाही जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सौ सुवर्णा बारटक्के, तसेच ठाणे महानगरपालिका क्रीडा उपायुक्त सौ मीनल पालांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.. -श्री नामदेव पाटील ठाणे प्रतिनिधी

संबंधित पोस्ट

जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी…

नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय “लॉन टेनिस” स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta