
सोशल मीडियावरील न्यायाधीशांवरील हल्ले हा न्यायालयाच्या निर्णयांवरील अत्यंत धोकादायक ट्रेंड असल्याचे म्हटले आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका…
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी सोशल मीडियावरील न्यायाधीशांवरील हल्ले हा न्यायालयाच्या निर्णयांवरील अत्यंत धोकादायक ट्रेंड असल्याचे म्हटले आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे
सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने नुपूर शर्मा यांच्यावर पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत कठोर टिप्पणी केली होती. यानंतर न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला म्हणाले होते की, न्यायमूर्तींवर त्यांच्या निर्णयासाठी वैयक्तिक हल्ले धोकादायक स्थितीकडे वाटचाल करत आहेत. न्यायमूर्ती पारडीवाला हे द्विसदस्यीय खंडपीठाचा एक भाग होते. त्यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्याना संपूर्ण देशाची माफी मागण्याचा आदेश दिला होता.
न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत या दोघांच्याही याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर सोशल मीडिया युजर्सकडून दोन्ही न्यायमूर्तींवर टीका केलीहोती. नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या शाब्दिक टिप्पणीनंतरच त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. यावरून जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, पंतप्रधानांच्या ‘न्यू इंडिया’मध्ये न्यायाधीशांनाही मोदी भक्तांपासून धोका असल्याचं म्हणत मोदी सरकारवर टीका केली.



