vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

आज रविवार दि. 10 जुलै रोजी आषाढी ( देवशयनी) एकादशी। आहे . संपूर्ण भारत वर्षात या दिवशी उपवास करुन भगवंताचे नाम स्मरण केले जाते . 

🌹एकादशी चे आध्यात्मिक रहस्य🌹 :- आज रविवार दि. 10 जुलै रोजी आषाढी ( देवशयनी) एकादशी। आहे . संपूर्ण भारत वर्षात या दिवशी उपवास करुन भगवंताचे नाम स्मरण केले जाते .

 

या निमित्ताने थोडे एकादशी पाठीमागील आध्यात्मिक रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करुया .

 

चंद्राच्या रोजच्या गती मुळे रोज एक तिथी येते .

प्रत्येक महिन्यात दोन पक्ष व प्रत्येक पक्षात 15 तिथी येत असतात .

त्यापैकी 11 व्या तिथीला एकादशी म्हटली जाते . एकादश म्हणजे 11 .

 

महिन्यातून दोन वेळा एकादशी तिथी येते .

कृष्ण पक्ष एकादशी व शुक्ल पक्ष एकादशी .

 

मनुष्य शरीरात मन ,शरीर व आत्मा असे चेतनेचे तीन प्रमुख स्तर आहेत .

तसेच मनुष्य शरीरात सप्तचक्र आहेत .

 

सहस्त्रार हे सर्वोच्च चक्र आहे ते सोडून सहा चक्रे उरतात . मूलाधार ,

स्वाधिष्ठान , मणिपूर , अनाहत , विशुद्धी व आज्ञा अशी षटचक्रे आहेत .

 

मन या चक्रातुन सदैव फिरत असते .

आध्यात्म व ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो .

पुरुषसूक्तात म्हणूनच म्हटले आहे कि

” चंद्रमा मनसो जात: ”

 

एकादशी च्या दिवशी मन हे आज्ञा चक्र व अनाहत चक्र यात स्थिर रहात असते .

ही दोन्ही चक्रे चंद्राच्या गतीच्या प्रभावखाली असतात . या दोन चक्रात मन स्थिर राहणे स्वाभाविक सोपे असते कारण या दोन चक्रावर चंद्राचा जास्त प्रभाव असतो म्हणून योग व आध्यात्म मार्गावर देवता किंवा गुरु यांचे ध्यान किंवा निर्गुण ध्यान करताना आज्ञा चक्र किंवा अनाहत चक्रावर करतात .

 

आणि एकादशी च्या दिवशी मन या दोन चक्रावर आपोआप सहजपणे स्थिर होत असते ज्यामुळे ध्यान केंद्रित करणे सोपे जाते .

 

उपवास म्हणजे लंघन केल्यामुळे शरीरात metabolism कमी होते . अन्न पचन करण्यासाठी शरीराची सर्वात जास्त उर्जा खर्च होत असते . अन्न पचन होण्यासाठी मेंदू आपल्या शरीरातील अन्य अवयवांची सर्व उर्जा पचन संस्था कडे वळवतो . त्यामुळे खुप जास्त पोटभर जेवल्यावर पोट जड झाल्यासारखे होते व आपल्याला झोप आल्यासारखे वाटते कारण खुप जेवल्यामुळे पचन संस्था वर ताण येवुन मेंदू झोपेची आज्ञा देतो व झोपल्यामुळे इतर अवयव शांत होतात व पूर्ण उर्जा पचन संस्था कडे वळवण्यात येते .

तर उपवास केल्यामुळे ही उर्जा पचन संस्था साठी अतिरिक्त खर्च न होता शरीरात सर्व अवयवां साठी समान खर्च केली जाते . त्यामुळे शरीर हे active झालेल्या मनाला support करते आध्यात्मिक उन्नतीसाठी .

 

एकादशी च्या दिवशी मन हे आज्ञा चक्र व अनाहत चक्रात स्थिर आपोआप होते व त्या दिवशी च्या उपवासामुळे शरीर पण अन्नपचनासाठी अतिरिक्त उर्जा खर्च करत नाही व शरीर शिथिल पडत नाही .त्यामुळे शरीर व मन active mode मधे असल्याने आत्मा active होतो . व आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत होते . या अवस्थेत जेव्हा आपण काही आध्यात्मिक साधना करतो तेव्हा शरीर मन व आत्मा यांचा balance होवुन आध्यात्मिक उन्नतीसाठी आध्यात्मिक उर्जा तयार होण्याची क्रिया सोपी होते .

 

शुक्ल पक्षातील एकादशी ला मन आज्ञा चक्रात स्थिर होते तर कृष्ण पक्ष एकादशी ला अनाहत चक्रात स्थिर होते .

त्यामुळे या दोन दिवशी ध्यान धारणा साधना करण्यासाठी मन आपोआप स्थिर व्हायला मदत होते .

 

पुराणात याविषयी एक कथा सांगितली जाते .

कृत युगात मूर नावाचा राक्षस होवुन गेला ज्याने देव व ऋषी मुनी यांना खुप त्रास दिला . देवराज इंद्र मग भगवान विष्णु यांना शरण गेले . भगवान विष्णु यांनी 1000 वर्ष मूर राक्षसाशी युद्ध केले . युद्ध करताना भगवान विष्णु विश्राम करण्यासाठी बदरिकाश्रमात सिंहावती गुफेत पहुडले . त्यावेळी मूर दैत्य पण त्यांच्या मागे तेथे आला व त्यांना मारण्यासाठी त्याने तलवार उगारली . त्यावेळी भगवान विष्णु यांच्या शरीरातून एक तेजोमयी कुमारी अवतीर्ण झाली जिच्या हातात आयुधे होती . तिने मूर दैत्यास युद्धासाठी आव्हान दिले . हुंकार करुन तिने मूर दैत्यास ठार मारले व क्षणात भस्मसात केले . भगवान विष्णु यामुळे प्रसन्न झाले व त्या देवीस त्यांनी एकादशी हे नाव प्रदान केले . कारण तो 11 वा दिवस किंवा तिथी होती .

 

आता येथे कथेमागील logic चा विचार करावा ..

सांख्य तंत्रा नुसार आपले शरीर 25 तत्वांनी बनले आहे . पंचविंशति तत्त्व . मूर दैत्य हा त्यांचे प्रतिक आहे . वर्ण मालेत क ट त प यादि अंकशास्त्रा नुसार

मू :- 5 ( प फ ब भ म या क्रमानुसार )

र :- 2 ( य र ल व या क्रमानुसार )

असे अंक प्राप्त होतात .

म्हणजे 2 & 5 = 25

म्हणजे मूर दैत्याचा नाश म्हणजे materialistic worldy matter पासून detachment जे मोक्षाकडे घेवुन जाईल . ( ultimate blissful state )

ही अवस्था प्रात करण्यासाठी जे ज्ञान प्राप्त करावे लागेल त्यासाठी मनावर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे कारण मन खुप चंचल आहे ते सहजासहजी ताब्यात येत नाही .

मग त्यासाठी एकादशी चा उपयोग करावा . एकादशी ने च मूर दैत्याचा नाश केला होता . म्हणजे एकादशी च्या दिवशी उपवास करुन आध्यात्मिक साधना केल्यास भवपाश पासुन मुक्त होवुन मोक्षाकडे वाटचाल सोपी होते .

एकादशी देवीने हुंकार करुन मूर दैत्यास ठार केले .

हे ” हुं ” बीज मंत्र मूलाधार व मणिपूर चक्र जागृती साठी अत्यंत लाभदायक आहे .

तसेच आपण ” विठ्ठल विठ्ठल ” असे सतत जप करत गेल्यास त्या vibrations चा मणिपूर चक्रावर ( नाभी चक्र ) प्रभाव पडतो . हे अनुभवून पहा .

 

एकादश म्हणजे 11 . आपले 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये व मन असे एकूण 11 इंद्रिये झाली . या 11 म्हणजे एकादश इंद्रियां वर ताबा मिळवणे यासाठी एकादशी तिथी सर्वात उत्तम असते .

यादिवशी फलाहार किंवा दूध किंवा सात्विक अल्पोपहार वगैरे घ्यावे .

 

पृथ्वीवर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पडत असतो . पृथ्वीचा centrifugal force व चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल ( gravitational force ) त्यामुळे पृथ्वीवर समुद्राला भरती ओहटी येत असते . जेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते त्याच वेळी चंद्र ही पृथ्वीला आपल्या कडे खेचतो .

पौर्णिमा व अमावास्येला समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते . त्याच प्रमाणे अष्टमी ला समुद्राला भरती येत असते .

मनुष्य शरीरात पण पाण्याचे प्रमाण आहे त्यावर देखील चंद्राच्या या गुरुत्वाकर्षण चा प्रभाव पडतो . या काळात चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येत असतो .

 

ज्योतिष व आध्यात्म नुसार चंद्र मनाचा कारक आहे त्यामुळे या काळात भावनिक आंदोलने वाढतात या काळात .चंद्राचा मनावर प्रभाव वाढतो .

 

आपण जे अन्न खातो ते पूर्ण पणे पचून मेंदू पर्यंत त्याची उर्जा पोहोचायला 3-4 दिवस लागतात . त्यामुळे अमावस्या पौर्णिमा यांच्या 3-4 दिवस आधी म्हणजे एकादशी व अष्टमी च्या 4 दिवस आधी म्हणजे चतुर्थी ला ( संकष्टी चतुर्थी ) जर आपल्या उपवास केला किंवा अल्पाहार सात्विक आहार घेतला तर अन्नाच्या माध्यमातून मेंदू पर्यंत पोहोचणारी अमावस्या पौर्णिमा व अष्टमी ला सुद्धा सात्विक व सकारात्मक राहते .

 

आध्यात्मिक दृष्टीने पाहता एकादशी ते पंचमी तिथी या काळात चंद्राचा आपल्या पचन संस्था वर जास्त प्रभाव असतो . पचन संस्था बिघडली तर मेंदूच्या कार्यक्षमता वर परिणाम होतो . त्यामुळे विचार प्रक्रिया, निर्णय क्षमता व भावनिकता यावर परिणाम होतो .

त्यामुळे एकादशी ला लंघन उपवास किंवा सात्विक अल्पोपहार घेतल्यास पचन संस्था सुरळीतपणे कार्य करते .आणि मेंदू पण पूर्ण कार्यक्षम होवुन काम करतो .

 

एकादशी ला पृथ्वीवरील atmospheric pressure हे lowest असते त्यामुळे त्या दिवशी केलेला उपवास हा शरीरातील toxins बाहेर टाकुन cleansing साठी उपयोगी ठरतो . ज्या दिवशी high atmospheric pressure असते त्यादिवशी उपवास केल्यास शरीरास पूरक नसते . त्यामुळे द्वादशीला पारणे सोडून भरपूर खातात . महिन्यातून कमीतकमी दोन वेळा लंघन उपवास केल्यास शरीराची detoxification process ( विषारी पदार्थ बाहेर फेकणे ) सुलभ होते व शरीर निरोगी राहते . सत्त्व रज तम या त्रिगुणापैकी शरीरास सत्त्व गुण जास्त लाभदायी आहे मग ते अन्नाच्या माध्यमातून असेल किंवा विचारांच्या माध्यमातून असेल .

एकादशी ला ब्रह्मांडातील सत्त्व गुण / सात्विक लहरी जास्त प्रमाणात वाढलेल्या असतात .

म्हणून एकादशी ला उपवास करुन किंवा अल्प प्रमाणात सात्विक आहार घेवुन व आध्यात्मिक साधना पूजन मंत्र जप स्तोत्र पाठ नाम स्मरण इ. माध्यमातून या सात्विक लहरी आपण आकर्षित करुन घेतो ज्यामुळे आपली आध्यात्मिक पातळी उंचावते .

 

स्त्रियांच्या शरीरात जल तत्त्व जास्त प्रमाणात असते व स्त्रियांच्या मासिक पाळी वर ज्योतिष दृष्टीने चंद्राचा प्रभाव असतो म्हणून एका विशिष्ट नक्षत्रावर पाळी परत येत असते दर 27-28 दिवसांनी . त्यामुळे अमावस्या पौर्णिमा अष्टमी ला चंद्राच्या पृथ्वीवरील जल तत्त्वावर जो सूक्ष्म परिणाम होत असतो तो स्त्रियांच्या शरीरावर जास्त होतो . म्हणून स्त्रियां साठी या उपवासाचे महत्त्व जास्त ठरते .

 

अशा प्रकारे एकादशी ला उपवास किंवा सात्विक अल्पोपहार केल्याने शरीराचे detoxification होते . शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात . यामुळे आरोग्य सुधारते व आपोआप निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होते .

 

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी ला देवशयनी एकादशी म्हणतात . या दिवसापासून चातुर्मास सुरु होतो .

पावसाळ्यात रोगट हवामान असते व पचन संस्था कमजोर होते त्यामुळे या चातुर्मासात व्रत वैकल्ये जास्त असतात जेणेकरून आपली पचन संस्था सुरळीत रहावी . भगवान विष्णु आपल्या शरीरात नाभी चक्रात वास करुन असतात व हे चक्र पचन संस्था शी संबंधित आहे म्हणून चातुर्मासात भगवान विष्णु यांची उपासना जास्त असते .

आणि वर सांगितले तसे ” विठ्ठल ” हा शब्द भरभर उच्चारत गेला कि मणिपूर चक्रावर प्रभाव पडत जातो म्हणून विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या भक्तीचे नामस्मरणाचे एकादशी ला जास्त महत्त्व असते .

 

या काळात सात्विक आहार उपवास यामुळे पचन संस्था सुरळीत राहते व मन पण स्थिर होते . त्यामुळे आध्यात्मिक उन्नती गाठणे सुलभ जाते .

 

एकादशीला उपवास करावे किंवा ते शक्य नसेल हलका आहार फलाहार घ्यावा . श्रद्धापूर्वक अंत:करणाने भगवान विष्णु यांचे पूजन, पुरुषसूक्त पाठ किंवा स्तोत्र पाठ , विष्णु मंत्र जप , नाम स्मरण, विष्णु सहस्त्रनाम पाठ करावा . ” विठ्ठल विठ्ठल ” असे सतत नामस्मरण करत रहावे .

 

इंद्रियां पासुन मन वळवले की ते भौतिक गोष्टी पासुन दूर होते व आध्यात्मिक उर्जा तयार होते . त्यामुळे 10 इंद्रिये व मन असे 11 तत्त्व ईश्वरी साधनेत गुंतवले की आध्यात्मिक उन्नती सुलभ होते . हेच एकादशी चे सार आहे व एकादशी तिथीला मन आज्ञा चक्र व अनाहत चक्रात आपोआप स्थिर होते त्यामुळे एकादशी तिथीचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे .

 

Thus Ekadashi is very important for purification of mind, body and soul . By doing fasting we clean all the toxins from the body . So the body will feel light and energetic and blissful .

 

ॐ श्री विष्णवे नम:

ॐ श्री विष्णवे नम:

ॐ श्री विष्णवे नम: . शिवशंकर स्वामी इटोलीकर

संबंधित पोस्ट

सेवाभाव, समर्पण आणि मानवतेचा दिव्य उत्सव78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ मुंबई व महाराष्ट्रातून हजारो सेवादार समालखाला रवानाआत्ममंथन करून मनामध्ये व्याप्त दुर्गुण दूर करा- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज..

vishwatmaklokswamivarta

पौर्णिमा आणि अमावास्या पंधरा दिवसातूनच का येतात ? आणि अमावास्या घातक असते का ?

vishwatmaklokswamivarta

गीता भक्ती अमृत संत महोत्सवासाठी भगवान महाराज सरकटे यांना सेवेची संधी…

vishwatmaklokswamivarta

रुद्रावतार काल भैरव उत्पत्तीची पौराणिक कथा                                                                      

vishwatmaklokswamivarta

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज..

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा