vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वसई परिसरात झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 6 लाखाची मदत जाहीर

वसई परिसरात झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 6 लाखाची मदत जाहीर…

मुंबई प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात दरड कोसळल्याची घटना आज घडली. यामध्ये अनेक लोक अडकले होते, तसेच अनेक घरांचे नुकसानही झाले आहे. या भूस्खलनात एक व्यक्ती आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024″ च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना राज्य शासनाचा मदतीचा हात…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्र प्रथम, करोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन , कारगिल विजय दिवस आणि ओलंपिक वर संबोधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

लोणारी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक- बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचा निर्णय : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल शासकीय महापूजा सुरु असताना खुले राहणार मुखदर्शन…