vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई सेशन कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; संजय राऊतांना कोर्टात हजर केले जाणार…

 मुंबई सेशन कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; संजय राऊतांना कोर्टात हजर केले जाणार…

 

मुंबई प्रतिनिधी: शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात हजर केलं जाणार आहे. यामुळे कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे निर्माण होई नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ईडी कार्यालय, जे.जे. हॉस्पिटल परिसर आणि मुंबई सेशन कोर्टबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

 

मुंबई झोन 1 चे DCP डॉ. हरी बालाजी यांनी स्वतः मुंबई सेशन कोर्टच्या परिसरात येऊन सुरक्षेचा आढावा घेतला. दक्षिण मुंबईत एकूण चार ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आज जवळपास 200 पोलीस बल तैनात करण्यात आलं आहे.

 

100 पोलीस ईडी कार्यालयबाहेर बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहेत. तर 50 पोलीस जेजे रुग्णालय बाहेर आणि जवळपास 50 पोलीस सेशन कोर्टाच्या परिसरात बंदोबस्त करत आहेत.

 

मुंबईत एकूण 4 स्ट्रायकिंग फोर्स

2 फोर्स ईडी कार्यालय बाहेर

1 फोर्स जे.जे. रुग्णालय

1 फोर्स सेशन कोर्ट जवळ

 

आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणाचा उल्लेखच नाही?

दरम्यान आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणाचा उल्लेखच नाही असा दावा संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. खोट्या आरोपात संजय राऊत यांना अटक केल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.

 

आता नक्की कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे आहे याप्रकरणात संजय राऊत दोषी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांच्या 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाकडून आवाहन*

देशातील गरिबीचा व उपासमारीचा प्रश्न सोडविण्यापासून गेल्या ७० वर्षांत कोणी अडवले होते, असा प्रश्न मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

मेगा लेदर क्लस्टर प्रकल्प प्रस्तावावर जलदगतीने कार्यवाही करण्याचे मंत्री कु.तटकरे यांच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

  मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोघांचा बळी….