
टोलमाफीसंबंधी नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा….
नवी दिल्ली प्रतिनिधी १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो, गडकरींनी मांडला मुद्दा
शहरातील टोल माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो असं नितीन गडकरींनी निदर्शनास आणून दिलं. हा मागील सरकारचा दोष आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
नितीन गडकरी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते. राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती.
स्थानिक नागरिकांनाही प्रवास करताना टोल भरावा लागत असल्याचा मुद्दा सदस्यांकडून मांडण्यात आला. यावेळी गडकरींनी शहरातील टोल माफ केला जाईल असं स्पष्ट केलं.



