
*राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार राजभवन येथे संपन्न**विजयकुमार गावित, संजय राठोड, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांसह १८ जणांना मंत्री पदाची शपथ*
मुंबई : प्रतिनिधी (रविंद्र भोजने ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या विस्तारात १८ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली.
राजभवनातील दरबार हॉल येथे मंगळवारी (दि. ९) रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई व मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली.



