
Delhi Dy CM Manish Sisodia यांच्या घरी सीबीआयची धाड; ‘स्वागत आहे आम्ही कट्टर ईमानदार’ सिसोदियांचं ट्वीट….
दिल्ली प्रतिनिधी
हे आपचे नेते आहेत. त्यांच्या घरी यापूर्वी अशादिल्लीचे उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी आज सकाळी सीबीआयची धाडी टाकण्यात आल्या आहेत.
दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी आज सकाळी सीबीआयची टीम पोहचली आहे. सीबीआय च्या कारवाई नंतर सिसोदीया यांनी काही ट्वीट करत ‘स्वागत आहे आम्ही कट्टर ईमानदार’ असं म्हटलं आहे. यापूर्वीही अशा धाडी टाकण्यात आल्या होत्या तेव्हाही काही मिळालं नाही आणि आताही काही मिळणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. excise policy case मध्ये 21 विविध ठिकाणी दिल्ली,एनसीआर मध्ये धाडी टाकल्या जात आहेत त्यामध्ये सिसोदियांच्या घराचाही समावेश आहे.



