
*राजस्थान सरकार विरोधात भीम आर्मी व आसपाची काँग्रेस मुख्यालयावर निदर्शने*
मुंबई : प्रतिनिधी – राजस्थान मधील अल्पवयीन विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ भीम आर्मी आणि आजाद समाज पार्टीने काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी करीत काँग्रेसच्या टिळक भवन दादर येथील मुख्यालयावर तीव्र निदर्शने केली. पोलीसांनी या आंदोलकांना अटक केली.भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे,महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ,मुंबई कार्याध्यक्ष अविनाश गरूड, आजाद समाज पार्टीचे.कैलास जैसवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुशीलाताई कापूरे,अविनाश समींदर ,विजय कांबळे, शशांक कांबळे,बाळूभाऊ साळे, सुरेश धाडी,मनीषाताई उबाळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी गेहलोत सरकारविरोधी घोषणा दिल्या.



