vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दादरमधील प्रसिद्ध सुविधा शो रूमच्या मालकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ…..मुंबई-अहमदाबाद महामार्गशेजारील एका वाडीत त्यांचा मृतदेह सापडला 

 दादरमधील प्रसिद्ध सुविधा शो रूमच्या मालकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ…..मुंबई-अहमदाबाद महामार्गशेजारील एका वाडीत त्यांचा मृतदेह सापडला

दादरमधील प्रसिद्ध सुविधा या शो रुमच्या मालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गशेजारील एका वाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. कल्पेश मारू यांचा मृतदेह विरार हद्दीत सापडला असून मांडवी पोलिसांकडून पुढील तपास सुरू

मुंबई प्रतिनिधी :दादरमधील प्रसिद्ध सुविधा या शो रुमच्या मालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गशेजारील एका वाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. कल्पेश मारू यांचा मृतदेह विरार हद्दीत सापडला असून मांडवी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

कल्पेश मारू यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आत्महत्येमागचं कारण अजून पुढे आलेलं नाही.

 

कल्पेश मारू यांचा मृतदेह विरार हद्दीतील शिरसाड येथे सापडला आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी हा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता, शिवाय मृतदेहासोबत कोणतीही सुसाईडनोट पोलिसांना सापडली नसल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास आता मांडवी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कल्पेश मारू हे बऱ्याच दिवसांपासून आजारपणाला कंटाळले होते. त्यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे का याचाही पोलीस तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांचा आक्रोश, ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर , पोलिसांचा लाठीचार्ज, वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ३१ रक्तपेढयांमध्ये ॲलिकॉट मशीन महिनाभरात बसविणार- मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

vishwatmaklokswamivarta

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते इंगोले नगरमधील नागरिकांना जागेची सनद बहाल स्वमालकीची जागा असल्याची सनद मिळाल्याने पट्टेधारकांच्या डोळ्यात आनंदाश्रू; ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत विशेष मोहीम

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च नीटपणे तपासून घ्यावा,केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुरजकुमार गुप्ता यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार, पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात.. भाजपा खासदार अरविंद धर्मापुरी यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta