vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-लोकशाही बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवं मतदारांनी अन्य युवकांना तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदार नोंदणी आणि मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 16 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते.

लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कारार्थांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादी हे मतदान प्रक्रीयेचा आत्मा आहे. मतदान प्रक्रीया ही लोकशाहीचा आत्मा आहे. नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे. मतदार यादी सर्वसमावेशक व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. महिला, दिव्यांग, आदिवासी, कामगार आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. युवकांची नोंदणी करून त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. ज्यां नवमतदार यांनी मताधिकार बजावला आहे त्यांनी हे जनजागृती करावी. तसेच मतदार नोंदणीसाठी युवक व युवतींनी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी मतदार दिन कार्यक्रमाची माहिती दिली. भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने 2011 पासून मतदार जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसिलदार विक्रम पाटील यांनी मानले.उत्कृष्ट कामगिरीसाठी अधिकारी व कर्मचारी सत्कारजिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, प्रविण पवार, उत्कृष्ट वृत्तपत्र दैनिक रायगड टाईम्सचे संपादक राजन वेलकर, उत्कृष्ट समन्वय अधिकारी,समन्वय अधिकारी मतदान यंत्र व्यवस्थापन, टपाली मतदान व मतमोजणी, समन्वय अधिकारी निवडणूक खर्च नियंत्रण समिती तसेच इतर विभागातील मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/निवडणुक नायब तहसिलदार/महसूल सहायक अधिकारी/महसूल सहायक/शिपाई/डाटा एंन्ट्री ऑपरेटर/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/महाविद्यालय या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

00000000

संबंधित पोस्ट

संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण-सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

vishwatmaklokswamivarta

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..

जागतिक युवा कौशल्य विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरतीसाठी1 ते 8 जुलै कालावधीत ऑनलाईन परीक्षा..