
धारावीत आज दुपारी 3 च्या सुमारास अचानक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अवघ्या अर्ध्या तासात हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री यांच्या घराकडे मोर्चा वळवून जोरदार आंदोलन सुरू केलं. पोलिसांचा मग लाठीचार्ज
मुंबई : अगदी काही तासात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर जमा होत रान पेटवलं. परीक्षा ऑनलाईन या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. या आंदोलनात हाजारो विद्यार्थ्यांचा उद्रेक दिसून आला. मात्र या उद्रेकाला हिंदुस्तानी भाऊ जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अटकेची शक्यता आहे. या विद्यार्थ्यी आंदोलनाची चौकशी करावी असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. हिंदुस्थानी भाऊवर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावल्याचा आरोप आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्याता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न करूनही आपलं ऐकूण न घेतल्याचा आरोप आधी हिंदुस्तानी भाऊकडून करण्यात आला.
आक्रमक आंदोलनानंतर हिंदुस्तानी भाऊशी चर्चा करून असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडी यांनी दिलं आहे. तर उद्या बैठक घेऊ असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत, मात्र हिंदुस्तानी भाऊला अटक झाली तर ही चर्चा होणार का? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा निश्चितच विचार केला जाईल, काही विद्यार्थी आंदोलन करत असले तरी परीक्षा घ्या म्हणाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या मागणीचाही विचार करावा लागेल असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आंदोलन करून नये असे आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे.
धारावीत आज दुपारी 3 च्या सुमारास अचानक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अवघ्या अर्ध्या तासात हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराकडे मोर्चा वळवून जोरदार आंदोलन सुरू केलं. यात विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा मोठा समावेश होता. रस्त्यावर अचानक हजारो विद्यार्थी आल्याने या ठिकाणी चक्का जाम झाला होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना पांगवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना न जुमानता आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठिमार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.t



