vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच..

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच..

मुंबई प्रतिनिधी

शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? या चर्चेना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

शिवसेनेत दसरा मेळाव्याला  विशेष महत्व आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे  असतांना दसरा मेळाव्यात बाळासाहेब काय बोलणार याकडे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष लागलेलं असायचं. बाळासाहेबांनंतर पुत्र उध्दव ठाकरेंनी या मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे या मेळाव्यातून भाषण करु लागले. गेले दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमिवर हा मेळावा होवू शकला नाही म्हणून यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा अगदी दणक्यात पार पडणार अशी समज होती पण या वर्षी दसऱ्याला शिवसेनेचं चित्र काही वेगळचं आहे. यावर्षी दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटात चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना कुणाची हा सत्तासंघर्ष सुरु असताना आता दसरा मेळावा कुणाचा सा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेला (BMC) परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना  नेमकी कोणाची? हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात  प्रलंबित आहे. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे.  अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? या चर्चेना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. 

 

तरी जर उध्दव ठाकरेंच्या  गटा ऐवजी जर शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्यात आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दसरा मेळाव्याचं  भाषण देणार का अशी उत्सुकता राज्यातील जनतेला आहे. किंवा जोडीने सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  शिवसेनेच्या दसरा मेळव्यात एकाच व्यासपीठावर दिसतील या चर्चांना देखील उधाण आलं आहे.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे २५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

कुर्ला ते सीएसटी लोकल बंद  : मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व मुसळधार पावसासह  दमदार हजेरी सुरु..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी …

vishwatmaklokswamivarta

आज गॅस सिलेंडराच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात 16.50 रूपयांनी वाढ….

vishwatmaklokswamivarta

सर्वसमावेशक सल्लागार समिती बैठक महिलांचे हक्क संरक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी