
नवी दिल्ली येथून भारत जोडो यात्रा च्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पोहचले राजीव गांधी यांच्या स्मारकावर; ‘प्रेमाने द्वेषावर मात करण्याचा’ व्यक्त केला निर्धार…
नवी दिल्ली प्रतिनिधी
आजपासून राहुल गांधी कन्याकुमारी ते कश्मीर ही 150 दिवसांची भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या तोडीला तोड देण्यासाठी देशभरामध्ये काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा चे आयोजन करण्यात आलेले आहे याबाबत मोठ्या संख्येने देशवासीयांनी भारत जोडो यात्रेमध्ये सामील व्हा असे आवाहन यावेळी प्रियंका वादरा गांधी यांनी केले होते तर याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारक स्थळी जाऊन राहुल गांधी प्रार्थना केली आहे
Bharat Jodo Yatra’ च्या पार्श्वभूमीवर Rahul Gandhi हे वडील Rajiv Gandhi यांच्या स्मारकावर पोहचले. यावेळी त्यांना वंदन करून आज कन्याकुमारी ते कश्मीर अशी पुढील 150 दिवसांची यात्रा राहुल गांधी सुरू करणार आहेत. त्यांनी ट्वीट करत मी माझे वडील द्वेषाच्या राजकारणामुळे गमावले आहेत. पण आता यामुळे मी माझा प्रिय देश गमवू इच्छित नाही. ‘प्रेमाने द्वेषावर मात करू, आशेने भीतीवर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



