vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

बनावट आधारकार्ड व्दारे ॲमेझॉन व पिलपकार्ट कंपनीस गंडा घालून त्यांची फसवणुक करणाऱ्या उच्चशिक्षीत इंजिनिअर व त्याचे साथीदारांना डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन कडुन अटक.”

बनावट आधारकार्ड व्दारे ॲमेझॉन व पिलपकार्ट कंपनीस गंडा घालून त्यांची फसवणुक करणाऱ्या उच्चशिक्षीत इंजिनिअर व त्याचे साथीदारांना डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन कडुन अटक.”

 

#डोंबिवली:- मानपाडा पोलीस ठाणे कडुन बनावट आधारकार्डव्दारे ॲमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीस गंडा घालून त्यांनी फसवणुक करणाऱ्या उच्च शिक्षीत इंजिनिअर व त्याचे साथीदारांचे टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६९९ / २०२२ भादविक ४२०, ४०६, ४६५, ४६७,४६८, ४७१,१२०(ब),१०९,११४,३४ हा गुन्हा दाखल आहे. गुन्हयाची पार्श्वभुमी पाहता गुन्हयातील आरोपीत यांनी गुगल वरून ओळख नसलेल्या लोकांचे आधारकार्ड डाऊनलोड करून, त्या आधारकार्डवरील मुळ इसमाचा फोटो एडीटर अॅपवरुन क्रॉप करुन त्या ठिकाणी आरोपीत हे त्यांचा फोटो लावुन, सिमकार्ड विक्रेता आरोपी याचेकडुन सदर आधारकार्डचे आधारे सिमकार्ड खरेदी करायचे, सिमकार्डचे मोबाईल नंबरवरून ॲमेझॉन व फ्लीपकार्ट या कंपन्यांकडून ऑनलाईन मोबाईल, टॅब, आयपॅड, लॅपटॉप अशा वस्तु ऑर्डर करायचे.

 

कंपनीचा डिलेव्हरी बॉय सदर वस्तु देण्यास आल्यावर त्याचेकडुन सदर वस्तुचा बॉक्स ताब्यात घेवुन, त्यास पैसे मोजण्यात गुंतवुन ठेवुन, तो पैसे मोजत असताना सदरचा वस्तुचे पॅकींग बॉक्स त्यांचे साथीदार ताब्यात घेवून त्या बॉक्सला कटरने कापुन त्यातील वस्तु काढुन घेवुन त्या ठिकाणी त्या वजनाचा दगड, कपडा पॅक करून पैसे कमी असल्याचे कारणावरुन नंतर पैसे देतो असे कारण सांगुन सदर वस्तुचा बॉक्स डिलेव्हरी बॉयला परत करून, तो कंपनीस परत पाठविणेस सांगुन, डिलेव्हरी बॉयकडुन प्राप्त मोबाईल व इतर वस्तु कमी किमतीत बाजारात विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे.

 

आरोपीत यांनी गुजरात, कलकत्ता राज्यातील विविध शहरात तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, ठाणे, अलिबाग शहरात सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांना यापुर्वी कराड, अलिबाग, कासारवडवली या पोलीस ठाणेत अशा प्रकारचे गुन्हे केल्याबद्दल अटक करण्यात आली असल्याची माहिती तपासात प्राप्त झाली आहे. तरी आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर इतरही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे काय याचा तपास करीत आहोत.

 

नमुद गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली चालु करण्यात आला. तपास केलेल्या अथक प्रयत्नात आरोपीत नामे

 

१) रॉबीन अॅन्टनी आरुजा, वय २८ वर्षे

२) किरण अमृत बनसोडे, वय २६ वर्षे

३) रॉकी दिनेशकुमार कर्ण, वय २२ वर्षे,

४) नवीनसिंग राजकुमार सिंग, वय २२ वर्षे

५) अलोक गुल्लु यादव, वय २० वर्षे

 

यांना अटक करण्यात आलेली आहे.

 

सिमकार्ड आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ॲमेझॉन व फ्लिपकार्ट या यातील आरोपीत रॉबीन अॅन्टनी आरुजा हा एमटेक इंजिनिअर आहे. तसेच आरोपी रॉकी दिनेशकुमार कर्ण हा कॉलसेंटरमध्ये नोकरी करीत आहे. आरोपी अलोक गुल्लु यादव हा सिमकार्ड विक्रेता असुन, त्याचेकडुन आरोपोत हे जास्त पैसे देवून ग्राहकाची कोणतीही खात्री न करता सिमकार्ड खरेदी करुन, त्याआधारे ऑनलाईन वस्तु ऑर्डर करून, पैशातुन मौजेमजा करीत असायचे.

 

पसदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, श्री. अचिन गुजाळ, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३ कल्याण, श्री. सुनिल कुराडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोबिवली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. शेखर आगडे, सपोनिरी सुनिल तारमळे, सोडवा/प्रशांत वानखेडे, पोहवा/ अशोक कोकोडे, मोहवा / सुशांत तांबे, पोशि/ संतोष वायकर, पोसि ताराचंद सोनवने यांचे अथकाने केलेली आहे,

संबंधित पोस्ट

तिहार जेलमध्ये गँगवार, तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळीकडून टिल्लू ताजपुरियाची हत्या..

केरळमध्ये बायकोंची अदलाबदल करणारं मोठं रॅकेट, परपुरुषांशी लैंगिक संबंधांसाठी हजारोंचा पत्नीवर दबाव

vishwatmaklokswamivarta

चोरांनी रिक्षातून मोबाईल खेचताना महिलेचा तोल जाऊन खाली पडल्यामुळे जीव गेला होता, त्या चोरांना नौपाडा पोलिसांनी 24 तासात केली अटक.

मुंबईत हादरवून टाकणारी घटना : शहरातील मिरा रोड परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’  मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या आरोपी अटक..

मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त

vishwatmaklokswamivarta

सोनसाखळी जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; दोन्ही गुन्ह्यांतील ८६,७९४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त। माटुंगा पोलीस ठाण्याची कारवाई