
राजस्थान काँग्रेसने राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी निवडीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला आहे.
नवी दिल्ली प्रतिनिधी राजस्थान प्रतिनिधी
गेहलोत, वासनिक यांची नावे चर्चेत असताना राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव काँग्रेसने मंजूर केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर असताना त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मुकुल वासनिक यांचे नाव चर्चेत होते. मात्र, राजस्थान काँग्रेसने राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी निवडीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला आहे.
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. हे पद स्वीकारण्यास कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी अन्य नावाची चर्चा सुरु होती. दरम्यान, गेहलोत मुख्यमंत्री असलेल्या राजस्थान काँग्रेसने राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव मंजूर केला आहे.
राजस्थान कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची शनिवारी बैठक झाली, यात हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश निवडणूक अधिकारी राजेन्द्र सिंह कुम्पावत हे या बैठकीस उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्लॅन बी वर काम सुरु आहे. अशोक गेहलोत यांनी नकार दिल्यानंतर आता मुकुल वासनिक यांना कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी पुढे केले जाऊ शकते. त्यांच्याकडे पक्षाचे महासचिवपद देखील केले जाऊ शकते. सध्या हे पद राहुल गांधी यांचे निकटवर्तीय केसी वेणुगोपाल यांच्याकडे आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात काँग्रेसची धुरा कोणाच्या हाती येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला तर, 19 ऑक्टोबरला मतमोजणी या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 24 सप्टेंबरपासून नामांकन दाखल केले जाईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे.



