vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

काशीपीठाच्या जगद्गुरूंचा ऐतिहासिक गौरव सोहळानूतन जगद्गुरूंची भव्य मिरवणुक व आशीर्वचन

काशीपीठाच्या जगद्गुरूंचा ऐतिहासिक गौरव सोहळानूतन जगद्गुरूंची भव्य मिरवणुक व आशीर्वचन

लातूर : काशीपीठाच्या दोन जगद्गुरूंच्या सानिध्यात रविवारी भव्य ऐतिहासिक गौरव सोहळा पार पडला. नूतन जगद्गुरूंची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने रविवारी दिवाणजी मंगल कार्यालयात काशी पीठाचे नूतन जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी व जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डॉ. शांतीवीरलिंग शिवाचार्य महाराज,तर प्रमुख पाहुणे म्हणून अनेक शिवाचार्य महाराजांची उपस्थिती होती. वीरशैव सांस्कृतिक भवन येथे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची पाद्यपूजा करून महास्वामीजींची रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.अनेक भजनी मंडळींनीही सहभाग घेतला.

 

न भूतो न भविष्यती असा सोहळा…

लातूरकरांनी अतिशय भक्तीभावाने आयोजित केलेला हा सोहळा ऐतिहासिक आहे.दोन जगद्गुरुंच्या सानिध्यात हा सोहळा संपन्न होत आहे,ही भाग्याची गोष्ट आहे.काशी पीठाकडून यापुढील काळात या भागातील होतकरू विद्यार्थ्यांना जी मदत करता येईल, ती करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे आश्वासन जगद्गुरुंनी दिला.

 

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा…

शिक्षणाला अध्यात्माची जोड हवी असे सांगत या सोहळ्यात शारीरिक चिकित्सा आणि मानसिक चिकित्सा असा योग पहायला मिळाला असे मत जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले.

 

शिबिराला रुग्णाची गर्दी …

साई फाउंडेशनच्या वतीने या सोहळ्यानिमित्त डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला रुग्णांची गर्दी पडली होती.शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरात अनेक डॉक्टरांमार्फत विविध तपासण्या करण्यात आल्या. प्रारंभी नूतन जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षीय समारोप डॉ. शांतीवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. प्रास्ताविक प्रा.मन्मथप्पा पंचाक्षरी, सूत्रसंचालन शिवकांत स्वामी व प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी केले. आभार बसवंतअप्पा भरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड. गंगाधर हामणे, प्रा. भालचंद्र येडवे, विश्वनाथ निगुडगे, भालचंद्र मानकरी, उमाकांत कोरे, प्रकाश दुलंगे, सुभाष मुक्ता, सुरेश दोशेट्टी, ओमकार पंचाक्षरी, बालाजी पिंपळे, दीपक वांगसकर, बाबुराव वडगावे, पुष्पराज खुब्बा, ॲड. उमाशंकर पाटील, रामलिंग ठेसे, सतीश खेकडे, लक्ष्मीकांत मंठाळे, शरणाप्पा अंबुलगे, रामदास भोसले, वीरभद्र स्वामी आदींनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

भराडी देवीच्या  दरबारात भरला दैदिप्तमान सोहळा ,विटू नामाचा जागर- माईगडेवाडी*उपवास करणाऱ्या *महिलांसाठी संस्थेच्या वतीने साडी, ब्लॅंकेट व फराळाचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

गणपती अथर्वशीर्षाचे महत्व, फायदे आणि नियम

vishwatmaklokswamivarta

🔶 नवरात्रीमागील इतिहास🔶

vishwatmaklokswamivarta

🌹🌹 प्रभु प्रसाद 🌹🌹🌕🌕गुरु-तत्व🌕🌕

vishwatmaklokswamivarta

आज आहे तुळसी विवाह

vishwatmaklokswamivarta

शांतीदूत : निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज