vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संपूर्ण महाराष्ट्रात : ‘या’ राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज..

 संपूर्ण महाराष्ट्रात : ‘या’ राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज..

[ राज्य प्रतिनिधी: आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Meteorological Department) मते, राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाचा अंदाज दिला आहे. आर विदर्भासह मराठवाड्याच पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. (today maharashtra rain update)

 

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देण्यात आले.

 

गणेशविसर्जनानंतर राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्यामुळे पावसाचा जोर वाढला होता. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावील होती. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

 

मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद परिसरात मात्र, पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज (20 सप्टेंबर) विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सोलापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठळक कमी दाब क्षेत्र कायम

वायव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्यकडे सरकणारी ही प्रणाली परत मागे फिरून उत्तर प्रदेशकडे जाण्याचे संकेत आहेत.

 

औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं चांगली हजेरी लावली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील शिवना टाकळी प्रकल्प 100 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणाच्या पाच पैकी एक दरवाजा 10 सेमी उघडला असुन, त्याद्वारे 360 क्युसेक्सने पाणी शिवना नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवना नदी काठावरील लोकांना पुढे पुराचा धोका लक्षात घेता सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

वन विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव प्रयत्न – मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या पहिल्या सत्राचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोने रात्री उशीरापर्यत प्रवास करण्याची मुभा, मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात मोठे बदल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट,डोंबिवलीत सामूहिक बलात्कार; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ३३ जणांकडून 9 महिने अत्याचार

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात, कडक पोलिस बंदोबस्तासह मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ…

vishwatmaklokswamivarta

60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”धार्मिक क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी त्वरीत संपर्क साधावा  

vishwatmaklokswamivarta

हृदयविकार असलेली बालके रोगमुक्त होऊन घरी जातील; पालकांनी निश्चिंत राहावे – कामगार मंत्री सुरेश खाडे

vishwatmaklokswamivarta