vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवभोजन थाळीला लागणार ब्रेक; शिंदे – फडणवीस सरकार योजना बंद करण्याची शक्यता…

 शिवभोजन थाळीला लागणार ब्रेक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार योजना बंद करण्याची शक्यता…

मुंबई प्रतिनिधी

राज्यातील सत्तातरानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे  – देवेंद्र फडणवीस  सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. तसेच मंजूर केलेला निधी स्थगित करत मोठा झटका दिला होता. या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. त्यानंतर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) काळात सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीला (Shiv bhojan Thali) ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या शिवभोजन थाळीची (Shiv bhojan Thali) योजना बंद करण्यात येणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारला शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आता ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. (eknath shinde devendra fadnavis government may be close Shivbhojan Thali scheme)

या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला 10 रुपयांत जेवण मिळत होते. त्यामुळे आता ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. कोरोना काळात या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता. कोरोना काळात या थाळीची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. तर काही काळासाठी ही थाळी मोफत देण्यात येत होती.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.

सध्या राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. याची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रस्ताव आणला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारसमोर आला. मात्र, त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या योजनेला स्थगिती मिळणार की तशीच सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. www.crimesoch.asia

संबंधित पोस्ट

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशभरात 57.51% मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर मुंबईत सर्वात कमी मतदान

भाजपा महाराष्ट्र विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस ची निवडीचे जालना भाजपाकडून फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष  

vishwatmaklokswamivarta

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल,१०० कोटींची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार जोरात, पहिल्या 24 दिवसांतच काढले तब्बल 538 जीआर

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष