vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर, स्वत:च केली घोषणा

अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर, स्वत:च केली घोषणा…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

राजस्थानचे  मुख्यमंत्री अशोक गहलोत  यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक  लढवणार नसल्याचे गुरुवारी (29 सप्टेंबर) जाहीर केले. अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी  यांची त्यांच्या निवासस्थानी नवी दिल्ली  येथे भेट घेतली त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

 

राजस्थानचे (Rajasthan ) मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress president’s election) लढवणार नसल्याचे गुरुवारी (29 सप्टेंबर) जाहीर केले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आणि राज्यात त्यांच्या उत्तराधिकारी नियुक्तीवरून पक्षांतर्गत मोठा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांची त्यांच्या निवासस्थानी नवी दिल्ली (New Delhi) येथे भेट घेतली त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

 

 

अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी जे काही घडले त्याने आम्हाला धक्का बसला. मला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून हे सर्व घडले असा संदेश यातून देण्यात आला. परंतू, त्यात फारसे तथ्य नाही. घडल्या प्रकाराबद्दल मी पक्षाध्यक्षांची माफी मागितली, असे गेहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांना सांगितले.

पुढे बोलताना अशोक गहलोथ म्हणाले, मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली. त्यांनी ते मान्य केले नाही. आपण काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी त्यांना अध्यक्ष पदाची निवडणूक लढविणयास तयार असल्याचे सांगितले. पण आता त्या घटनेमुळे (राजस्थानमधील) मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वातावरणात मी नैतिकतेच्या मुद्द्यावर लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

गहलोत यांना प्रसारमाध्यमांनी लगेचच विचारले की, यापुढेही आपण राजस्थानचे मुख्यमंत्री राहणार आहात का? यावर गेहलोत म्हणाले की, ते मी ठरवणार नाही, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे ठरवतील. विशेष म्हणजे, गेहलोत यांच्या भेटीनंतर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट सोनिया गांधी यांना नंतर भेटणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

 

संबंधित पोस्ट

कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि हजारोंच्या साक्षीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेणार – ना. सुधीर मुनगंटीवार-महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिली विजयाची खात्री

vishwatmaklokswamivarta

विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

vishwatmaklokswamivarta

कायदे विषयक व विविध योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न भारतीय संविधानानुसार देशातील जनता हीच सर्वोच्च – न्यायमुर्ती संदीपकुमार मोरे  – लोकन्यायालयात मोटार अपघात, कौटुंबिक प्रकरणे तडजोडीने मिटविली जातात – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते  भारतीय न्याय व्यवस्था प्रगत असून यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ         

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील 6 वर्षांची मुलगी ठरली एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय…

खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा दाम्पत्याला आज दिलासा नाहीच, कोठडीतला मुक्काम वाढला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरीत,

vishwatmaklokswamivarta