vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर

Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर…

मागील काही दिवसात शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. बँकिंग शेअरमध्यही तेजी दिसून येत असून केमिकस शेअर्समध्येही खरेदीचा जोर दिसत आहे. बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 436 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 149 अंकांनी वधारला आणि 17,008 अंकांवर खुला झाला आहे. तर सेन्सेक्स 57,039 अंकांवर खुला झाला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बुधवारी बाजारात कमजोर कल दिसून आल्याचे कोटक सिक्युरीटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला 17,000 वर रझिस्टंस दाखवत आहे. या पातळीच्या खाली गेल्यास निफ्टी 16,700-16,650 पर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17,000 च्या वर गेल्यास, त्यात एक छोटी रिकव्हरी रॅली दिसू शकते. यार गेल्यास निर्देशांक 17,100-17,200 पर्यंत चढू शकतो.निफ्टीला 16,700 ते 16,650 दरम्यान मोठा सपोर्ट मिळत असल्याचे श्रीकांत म्हणाले. जर निफ्टी 16,700 च्या पातळीवर घसरला तर तुम्ही इंडेक्समधील हेवीवेट शेअर्स खरेदी केले पाहिजेत असेही ते म्हणाले.

संबंधित पोस्ट

अंबानींची मोठी घोषणा; Jio आणि रिलायन्स रिटेलसाठी आयपीओची तयारी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याथकीत कर्ज लाभार्थ्यांना व्याज रकमेत 50 टक्के सवलत..

vishwatmaklokswamivarta

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

लघुलेखक (उच्चश्रेणी) लघुलेखक, लघु टंकलेखक पदांकरीता इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी समक्ष कार्यालयात भेट द्यावी

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी समुपदेशन केंद्र सुरु