vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अंधेरी पोट निवडणुक: अंधेरी पूर्व विधानसभा जागेसाठी आज ऋतुजा लटके अर्ज भरणार

 

मुंबई प्रतिनिधी

ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगत होत्या. राजीनामा मंजुरी प्रकरणात काल कोर्टाकडून ऋतुजा लटकेंना दिलासा मिळाल्यानंतर आज त्या अर्ज भरणार आहेत.

 

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष वाढला आहे. अंधेरी पोट निवडणूकीत या गटांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात लढाई होणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागेवर ठाकरे गटाकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मागील काही दिवस ऋतुजा लटके (Rutuja Latke)  यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगत होत्या. राजीनामा मंजुरी प्रकरणात काल कोर्टाकडून ऋतुजा लटकेंना दिलासा मिळाल्यानंतर आज त्या अर्ज भरणार आहेत

 

ऋतुजा लटके या महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर कार्यरत होत्या. त्यांना प्रशासकीय सेवेतून मुक्तता मिळाल्याशिवाय अर्ज भरण्याची मुभा नव्हती. महापालिकेच्या कार्यालयातून त्यांना मुक्तता मिळावी त्या मागील काही दिवस आयुक्तांची भेट घेत होत्या. न्यायालयात त्यांनी याप्रकरणी दाद मागितल्यानंतर आज 11 वाजेपर्यंत राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी 3 वाजेपर्यंतची मुदत असल्याने त्याच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.

 

कोर्टाने काल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यांच्या गटातील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. ऋतुजा लटकेंनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान शिंदे गटाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होत असल्याच्या देखील बातम्या समोर येत होत्या पण त्यांनी त्या धुडकावून लावून आपण ‘मशाल’ चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं.

 

अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांचा समावेश आहे. अद्याप शिंदे गटाकडून  आपला उमेदवार जाहीर झालेला नाही. ही जागा शिंदे गट लढणार की भाजपा याबाबतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या जागी भाजपाचे मुरजी पटेल निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. 3 नोव्हेंबरला या जागेवर निवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी आहे.

 

संबंधित पोस्ट

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी …

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

लोअर परेलमध्ये ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, नऊ जण जखमी

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta