vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मनपा निवडणूका ? सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी..

मनपा निवडणूका ? सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

जुलै महिन्यात ओबीसी आरक्षण मंजूर झाले पण 92 नगरपरिषदांसाठी तो निर्णय लागू केला नसल्याने राज्य सरकार कोर्टात गेले आणि सार्‍याच निवडणूका रखडल्या होत्या.

 

राज्य सरकार कडून प्रभाग रचनेमध्ये करण्यात आलेले बदल, नगराध्यक्ष पदाची थेट निवड अशा गोष्टींना न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने महापालिका निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. पण आता याबाबत निर्णय होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याप्रकरणी सुनावणी होणार आहे. जुलै महिन्यात ओबीसी आरक्षण मंजूर झाले पण 92 नगरपरिषदांसाठी तो निर्णय लागू केला नसल्याने राज्य सरकार कोर्टात गेले आणि सार्‍याच निवडणूका रखडल्या होत्या.

मुंबई मनपा सह 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका आणि 13 नगरपंचायती निवडणूकांबाबत आज कोर्टात स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे

 

महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकार गेले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यावेळी नव्या सरकारकडून वॉर्ड रचनेमध्ये पुन्हा बदल केले आणि निवडणूका लांबणीवर पडल्या. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग आणि इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग अशी रचना केली. त्यानंतर शिंदे सरकारने पूर्वीप्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला महाविकास आघाडीने विरोध केला. त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

 

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’चा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर नाविन्यपूर्ण प्रसिद्धीवर भर द्या; नांदेडमधील ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरमध्ये सुरु होणार कॉंग्रेसचे ‘हाथ से हाथ जोड़ो’ अभियान…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील जेजुरी धरणे आंदोलनाचा अकरावा दिवस, ग्रामस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी..

मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीला मोठी आग.

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीकडून व्यापक जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta