
जालना येथील ताडहाद गांव येथे अनाधिकृत प्लॉटींग करून पाणी अडविले, रोगराईचा धोका वाढला,चौकशी करून कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा
जालना/प्रतिनिधी
ताडहादगांव(ता.अंबड) येथील गट नं. 538 वर शासकीय गायरान जमिनीवर नारायण रंगनाथ व मुरर्लीधर बाबासाहेब वाघुंडे यांनी अतिक्रमण केले आहे. अनाधिकृत प्लॉटींग केल्यामुळे बोरींगचे पाणी व सांडव्याचे पाणी न वाहता एकाच ठिकाणी राहत आहे. सद्य स्थितीत बोरींगपाशी 3 ते 4 फुट खोल पाणी साचले असून, गावात रोगराईची व आजार बळवण्याची दाट शक्यता आहे. तरी अनाधिकृत पाणी अडविणार्या व अनाधिकृत प्लॉटींग करणार्या विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी कुंडलिक विश्वनाथ हरिचंद्रे यांनी केली आहे.
याबाबत अंबड पं.स. चे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, ताडहादगांव येथील गट नंबर 538 मधील जमीनीचा काही भाग लागूनच गायरान जमीन आहे. सदरील जमिनीचीही प्लॉटींग करून, 7 ते 8 जणांना विक्री करून, लाखो रूपयांची कमाई करण्यात आली आहे. आज रोजी तिथे मोठाले बांधकाम झाले. खरेदीखत केलेल्या लोकांची नाव व जलसंधारण विभागाकडून संबंधीत शेतकर्याची तलावासाठी संपादीत झालेली जमिनीच्या सांडव्याच्या तलावामधून सुध्दा आज रोजी प्लॉटींग करून, घरे बांधकामे झाले आहे. व सांडव्याच्या प्रवाहाचा पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. यामुळे येथे पाणी साचून राहते. बोरींगजवळ 3 ते 4 फुट पाणी साचलेले आहे. त्यापासून मोठी रोगराई होण्याची शक्यता आहे.
शासनाच्या गायरान जमिनीची विक्री करणार्या व पाणी अडविणार्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्रे यांनी दिला आहे.



