
मुंबई महानगरपालिका पी उत्तर विभाग मालाड यांच्या कार्यालय येथील आवारामध्ये बचत गट प्रदर्शन दिवाळीचे वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले होते
मालाड प्रतिनिधी
सहाय्यक आयुक्त नियोजन विभागातर्फे विभागातील बचत गटाच्या महिलांकरिता प्रदर्शन व विक्री कार्यक्रम राबविण्यात आला या उपक्रमाची सुरुवात समाज विकास अधिकारी नियोजन महेंद्र गबने सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रदर्शनाची सुरुवात केली या प्रदर्शनामध्ये साधारण 15 महिला बचत गट सहभागी झाले आहेत
सहभागी झालेल्या महिलांनी दिवाळीसाठी लागणाऱ्या व घरगुती वापरातील वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या त्याकरिता पी उत्तर मनपा कार्यालयातील आवाराबाहेर वस्तू विक्री करिता जागेची व्यवस्था केली होती या
कार्यक्रमाला माजी नगरसेवक विनोद मिश्रा प्रशासकीय अधिकारी प्रांजली कोठावळे मालाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरदजी जाधव यांनी भेटी दिल्या या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय श्री किरण दिघावकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाकरिता रोहिणी राऊत अलका करांडे शहिदा शेख सविता खेडेकर अक्षदा कदम आणि रश्मी मोरे यांनी यांनी सहभाग नोंदविला सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुदाय संघटक सपना जयस्वाल सुनील उराडे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले शेवटी कार्यक्रम त सहभागी झालेलं बचत गटांचे व आलेल्या पाहुण्यांचे आभार समाज विकास अधिकारी श्री महेंद्र गभणे यांनी मानले



