vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

झारखंडमधील पश्चिम सिंगभूममध्ये क्रूरतेच्या सर्व सीमा पार; 10 नराधमांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूममध्ये क्रूरतेच्या सर्व सीमा पार; 10 नराधमांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर केला सामूहिक बलात्कार…

 

झारखंड प्रतिनिधीपोलिस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले की, मुफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.

 

झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात सुमारे 10 जणांनी एका 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरवर बलात्कार केला. पोलिसांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही महिला सध्या घरून काम करत होती. गुरुवारी संध्याकाळी ती तिच्या प्रियकरासोबत दुचाकीवरून जात असताना चाईबासा येथील जुन्या विमानतळाजवळ ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, आठ-दहा जणांच्या टोळक्याने दोघांना अडवले. प्रियकराला मारहाण केली आणि मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

पोलिस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी सांगितले की, मुफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. 

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी एका नामांकित आयटी कंपनीत काम करते. तिला तेथे सोडून आरोपी पळून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिची पर्स आणि मोबाईल फोनही हिसकावून घेतला. मुलगी कशीतरी घरी पोहोचली आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

 

संबंधित पोस्ट

सात विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अधिनियम लागू उच्च उत्पादन क्षमतेची दुधाळ जनावरे वाढविणार…

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर येथील घटना,बस दरीत कोसळून आठ जण ठार, 20 जखमी…

बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी सर्व प्रकारे मदत करू ,उमेद्च्या वतीने जानकी वस्तूचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी  ना. खा. केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

vishwatmaklokswamivarta