vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सात विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती

सात विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण आणि पोलीस निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती

 

रायगड जिमाका प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणुका शांत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देखील या मतदारसंघांसाठी खर्च, सर्वसाधारण तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांसाठी 4 सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व निवडणूक निरीक्षक यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. 188 पनवेल, 189 कर्जत मतदार संघासाठी साठी श्री दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 190 उरण आणि 191 पेण मतदार संघासाठी श्री संतोष कुमार राय तर 192 अलिबाग अलिबाग मतदार संघांसाठी श्रीमती रुही खान, 193 श्रीवर्धन आणि 194 महाड साठी सतीश कुमार एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून हे सर्व साधारण निरीक्षक पाहणी करतील. तसेच मतदान यंत्रे व मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ, उमेदवारी अर्ज छाननी, प्रक्रिया, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस, मतदानानंतर निवडक मतदान केंद्रांच्या संविधानिक कागदपत्रांची छाननी, मतमोजणी व विजयी उमेदवाराची घोषणा यासर्व प्रसंगी हे निरीक्षक उपस्थित राहतील.

 

निवडणूकांदरम्यान, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलिस निवडणूक निरीक्षक म्हणून स्वप्नील ममगाई यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, कायदा– सुव्यवस्था याबाबत हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील

संबंधित पोस्ट

हिमरु शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव प्राप्त करुन देणार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी शिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये योगादिन साजरा

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रजागर्क पदवी

vishwatmaklokswamivarta

नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम राज्यात सहा दिवसांत १.८४ लाख नवीन मतदारांची नोंदणी

बदनापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांची हृदय व रक्त तपासणी शिबी शिबिर संपन्न

श्री समर्थ सद्‌गुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त-कोप्रोली येथे उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta