vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अमेरिकेमध्ये सेंट लुईस शाळेत 19 वर्षीय व्यक्तीकडून अंदाधूंद गोळीबार; 3 ठार, 7 जखमी

अमेरिकेमध्ये St Louis शाळेत 19 वर्षीय व्यक्तीकडून अंदाधूंद गोळीबार; 3 ठार, 7 जखमी…

 

देश प्रतिनिधी

अमेरिकेत गोळीबारीची ही पहिलीच घटना नाही. मे महिन्यात अमेरिकेच्या टेक्सास भागात एका शाळेत झालेल्या फायरिंग मध्ये 18 मुलांसह 21 जणांचा जीव गेला होता.

 

अमेरिकेत एका शाळेमध्ये सोमवार (24 ऑक्टोबर) दिवशी अजून एक थरारनाट्य रंगलं आहे. 19 वर्षीय माथेफिरूने गोळीबार करत एक शिक्षक आणि विद्यार्थीनीचा जीव घेतला आहे. नंतर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये गोळीबार करणार्‍याचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मिसौरी मधिल सेंट लुईस शाळेतील आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ पसरली आहे. दरम्यान यंदाच्या वर्षातील ही 40 वी घटना आहे.

 

मीडीया रिपोर्ट्स नुसार, अमेरिकेच्या मध्य पश्चिमी भागात सेंट लुईस, मिसौरी भागात ही शाळा आहे. पोलिसांनी हल्लेखोरावर गोळीबार केला. किसेंट्रल विजुअल एंड परफॉर्मिंग आर्ट्स हाई स्कूल मध्ये झालेल्या या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस आयुक्त माइकल सैक यांनी दिली आहे. काही जणांवर बंदुकाच्या गोळ्यांमुळे जखमा झाल्या आहेत. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता हल्ला झाला आणि तातडीने पोलिसांना कळवताच 9.10 च्या सुमारास पोलिसदेखील घटनास्थळी आले. 10.30 पर्यंत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली होती. दरम्यान पोलिसांनी माहिती देताना गनमॅन शाळेत कसा घुसला हे सांगणं टाळलं आहे.

शाळेत विद्यार्थ्यांनी सेंट लुईस पोस्ट डिस्पॅच ला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की अनेकांनी सुरक्षित राहण्यासाठी स्वतःला आपापल्या खोलीत कोंडून घेतले. अद्याप गोळीबार करणार्‍या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. मात्र पोलिसांनी त्याच वय अंदाजे 19-20 वर्ष सांगितलं आहे. त्याचा गोळीबार करण्यामागील उद्देश देखील स्पष्ट झालेला नसल्याचं म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

चायना मध्ये म्यानमार  चे राजदूत यांचा चा मृत्यू; मागील वर्षभरात चौथ्या राजदूताचा अचानक मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

भारत, यूके, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये झालेल्या प्रेस ब्रिफिंगनंतर ‘महाबिझ २०२६- दुबई’ला जागतिक प्रतिसाद! – दुबई जागतिक व्यवसाय विस्तारासाठी सर्वाधिक पसंतीचे केंद्र

vishwatmaklokswamivarta

सीरियाच्या इदलिब प्रांताला भूकंपाचा धक्का…

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानमधील रुग्णालयाच्या छतावर आढळले 500 मृतदेह; अनेकांच्या शरीराचे अवयव गायब, तपास सुरु

vishwatmaklokswamivarta

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर पुन्हा हिजबुल्लाहचा हल्ला

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानातील कराचीमध्ये बॉम्बस्फोट, 3 ठार, 13 जण जखमी