vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

त्रिपुरारी पौर्णिमेच्या मराठमोठ्या शुभेच्छा, शेअर करत साजरी करा कार्तिकी पौर्णिमा

त्रिपुरारी पौर्णिमेच्या मराठमोठ्या शुभेच्छा, व्हाट्सअप फेसबुक इमेज इत्यादी शेअर करत साजरी करा कार्तिकी पौर्णिमा…

अध्यात्मिक प्रतिनिधी

कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित केलेला असतो. पवित्र महिन्यांपैकी एक कार्तिक महिना असल्याने या महिन्यातही विशेष पूजा-अर्चा केल्या जातात.

 

हिंदू धर्मीय कार्तिकी पौर्णिमे दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Purnima) साजरी करतात. यंदा ही त्रिपुरारी पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी आहे. उत्तर भारतामध्ये हा दिवस देव दीपावली (Dev Deepavali) म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. मग त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या नातलगांसोबत, मित्रमंडळींसोबत या दिवसाचा आनंद द्विगुणित करून हा दिवस स्पेशल अंदाजात साजरा करा. त्यासाठी सोशल मीडीयामध्ये तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळ्या मेसेजेस,Wishes, HD Images, Greetings, WhatsApp Status द्वारा शेअर करू शकता.

 

कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित केलेला असतो. पवित्र महिन्यांपैकी एक कार्तिक महिना असल्याने या महिन्यातही विशेष पूजा-अर्चा केल्या जातात. दिवाळीचा उत्तरार्ध या दिवसात असल्याने त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी देखील दिवे लावले जातात. सारा परिसर पणत्या, दिव्यांनी उजळून निघतो

कार्तिकी पौर्णिमा आणि देव दीपावलीच्या

हार्दिक शुभेच्छा!

कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. अशी पुराणकथा आहे. या राक्षसाच्या वधानंतर भगवान श्री शंकर यांची ओळख त्रिपुरारी झाली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र होते, अशी धारणा आहे. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजन केल्यास भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि समृध्दी नांदते. अशी देखील भावना आहे. मग या निमित्ताने तुमच्या प्रियजणांसोबत या दिवसाचा देखील आनंद द्विगुणित करा.

संबंधित पोस्ट

आध्यात्मिक मार्गात अडथळे का येतात?

पौर्णिमा आणि अमावास्या पंधरा दिवसातूनच का येतात ? आणि अमावास्या घातक असते का ?

vishwatmaklokswamivarta

शिव मानस पूजा

महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व काय?

vishwatmaklokswamivarta

योगीराज सद्गुरू शिवायनम: स्वामी शतमानोत्सव पुण्यतिथी समारोह*

vishwatmaklokswamivarta

|| परमवंदनीय भगवत्पाद् जगद्गुरु श्री रेणुकाचार्य ||