vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात नवे अजामीनपात्र वॉरंट जारी

खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात नवे अजामीनपात्र वॉरंट जारी…

अमरावती प्रतिनिधी

यापूर्वी सप्टेंबरमध्ये न्यायालयाने राणा आणि त्याच्या वडिलांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, ज्याची अंमलबजावणी अद्याप व्हायची आहे.

 

मुंबईतील एका न्यायालयाने सोमवारी लोकसभा खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांच्या वडिलांविरोधात बनावट जात प्रमाणपत्र (Fake Caste Certificate) प्रकरणात नवे अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले. यापूर्वी सप्टेंबरमध्ये न्यायालयाने राणा आणि त्याच्या वडिलांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, ज्याची अंमलबजावणी अद्याप व्हायची आहे. अमरावतीचे खासदार आणि त्यांच्या वडिलांविरोधात सुरू असलेल्या खटल्यात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी वॉरंटच्या अमंलबजावणीसाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळून लावत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, महानगर दंडाधिकारी पीआय मोकाशी यांनी या दोघांविरुद्ध नवीन अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

त्यानंतर वॉरंटच्या सेवेचा अहवाल दाखल करण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. मुंबईच्या मुलुंड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवले होते

 

दरम्यान, नवनीत राणा ज्या जागेवरून निवडून आल्या आहेत ती जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असल्याचा आरोप आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2021 मध्ये अमरावतीच्या खासदाराला जारी केलेले जात प्रमाणपत्रही रद्द केले होते. कारण ते बनावट कागदपत्रे वापरून मिळवले होते.

 

 

 

संबंधित पोस्ट

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

vishwatmaklokswamivarta

जागतिक टपाल दिन व राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येणार

भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? – संदीप देशपांडे, सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

४० हजार वर्षांपासून सर्व भारतीयांचा DNA सारखाच – आर एस एस प्रमुख मोहन भागवत

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाले महिला बचत गटांनी शिवलेले शालेय गणवेश ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत 1,04,703 गणवेश होणार तयार

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष: पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार यावरून सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; 27 जूनची परिस्थिती “जैसे थे ठेवा”, सिंघवींची मागणी

vishwatmaklokswamivarta