vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारत जोडो यात्रेआज 65वा दिवस दरम्यान अपघात, ट्रकची दोघांना धडक, एक ठार…

 भारत जोडो यात्रेआज 65वा दिवस दरम्यान अपघात, ट्रकची दोघांना धडक, एक ठार…

 

हिंगोली  प्रतिनिधी

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा  आज 65वा दिवस आहे. सध्या महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणारी ही यात्रा नांदेड जिल्ह्यातून आज (10 नोव्हेंबर) हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या यात्रेत आज एक धक्कादायक अपघात घडला.

 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 65वा दिवस आहे. सध्या महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणारी ही यात्रा नांदेड जिल्ह्यातून आज (10 नोव्हेंबर) हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या यात्रेत आज एक धक्कादायक अपघात घडला. सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकने दोघांना उडवले. या घटनेत एक जण ठार झाला. दुसरा एक किरकोळ जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना नांदेड जिल्ह्यातील नांदेड-अकोला महामार्गावर घडली.

नांदेड जिल्ह्यात असलेली भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी यात्रा मोंढा परिसरात होती. मोंढा परिसरात राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेनंतर यात्रा पिंपळगाव येथील थांब्याकडे निघाली. दरम्यान रात्री नऊ वाजणेच्या सुमारास यात्रा थांब्याकडे जाण्यासाठी ल नांदेड-अकोला महामार्गावरून पायी निघाली होती. यादरम्यान नांदेड अकोला महामार्गावरुन पायी निघालेल्या लोकांना एका भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघाता गणेशन (62) आणि सययुल (30) या दोघांना जोराद धडक बसली. या दरम्यान, गणेशन यांचे जागीच निधन झाले. तर सययुल यांच्यावर उपचार सुरु आहेत. गणेशन आणि सययुल हे तामिळनाडूचे रहिवासी आहेत.

अपघाताचे वृत्त कळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार मोहन हंबर्डे यांनी सययुल याच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाततातडीने उपस्थिती लावली. त्याच्यावर प्रदीर्घ काळ उपचार सुरु होते. दरम्यान, अशोक चव्हाण रात्री साडेबारा वाजेबर्यंत रुग्णलयातच होते असे समजते. गणेशण यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली यात्रा शुक्रवारी 65व्या दिवसात दाखल झाली. शेजारच्या तेलंगणातून ते महाराष्ट्रातील नांदेडमधील देगलूर येथे 7 नोव्हेंबरला रात्री पोहोचले होते आणि पाच दिवसांपासून जिल्ह्यात होते.नांदेडच्या अर्धापूर येथील पिंपळगाव महादेव येथील विठ्ठलराव देशमुख कार्यालयात यात्रेचा रात्रीचा मुक्काम होता. दाभड येथून नांदेड-हिंगोली रोडवर अर्धापूर येथे शुक्रवारी सकाळी पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली. दिवसाच्या उत्तरार्धात ही यात्रा चोरंबा फाटा येथून पुन्हा सुरू होऊन रात्री हिंगोली येथे पोहोचेल. सकाळी सहाच्या सुमारास यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर रस्त्यावरच राहूल गांधीजींचे स्वागत करण्यात आले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष आज ‘ श्री ‘ ची होणार प्राणप्रतिष्ठा स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

INS सतलज’ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

vishwatmaklokswamivarta

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली..

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार